अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुसह एकास केले जेरबंद …

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणारा गजाआड…

रायगड (प्रतिनिधी)- रायगड जिल्हयात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार करुन कारवाई करण्यासाठी पाठवले होते. या कारवाईत कर्जत मध्ये अवैध देशी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या आरोपीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.





दि.21 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ राजा पाटील, यांना गुप्तबातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली कि, एक इसम कर्जत येथील चारफाटा येथे देशी पिस्टल विक्री करण्याकरीता येणार असल्याची विश्वासनिय खबर प्राप्त झाली. त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यांनी सहा.पोलिस निरीक्षक नागेश कदम, सफौराजा पाटील, पोहवा संदीप पाटील, राकेश म्हात्रे, यशवंत झेमसे असे तपास पथक तयार केले. सदर पथकाने चारफाटा कर्जत या परिसरात सापळा रचला. त्या वेळी मिळालेल्या खबरीनुसार सदरचा इसम कर्जत येथील चारफाटा या परिसरात पथकास दिसून आला. सदर इसमास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी 02 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ 02 देशी पिस्टल व 05 जिवंत काडतूस मिळून आले. सदर इसमास 02 देशी पिस्टल व 05 जिवंत काडतूस सह ताब्यात घेण्यात आले.



सदर बाबत कर्जत पोलिस ठाणे येथे कॉ.गु.र.नं. 315/2023 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25,3, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135,37(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपी सतीश अनिल क्षेत्रे (वय-29 वर्षे), रा.पी.वाय. थोरात मार्ग, रूम नं.11 चाळ नं.11 टिळक नगर चेंबूर, मूळ रा.रूम नं.201, सद्‌गुरू मालवणी तडका हॉटेल जवळ, उलवे, ता. उरण जि. रायगड यास अटक करण्यात आली. सदर आरोपीकडे सदर पिस्टल व काडतूस कोठून व कश्यासाठी आणले, याबाबत सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम व पथक तपास करीत आहेत.



सदरची कामगिरी रायगड जिल्हयाचे पोलिस अधीक्षक, सोमनाथ घार्गे,अपर पोलिस अधिक्षक, अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम, सफौ राजेश पाटील, पोहवा संदीप पाटील, राकेश म्हात्रे, यशवंत झेमसे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!