शहरात येणारा देशी-विदेशी दारुचा साठा विशेष पथकाने केला जप्त
दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकाची कार्यवाही, चारचाकी वाहनासह एकूण 06,08,850/- रु. चा देशी-विदेशी दारूसाठा केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) जुन रोजी पोलिस अधिक्षक यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कार्यवाही करणेकामी शहर परीसरात पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून रामनगर, वर्धा येत असल्याची मुखबीर कडून खात्रीशीर माहिती पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकास मिळाल्यावरुन विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलिस स्टेशन रामनगर येथील पोलिस स्टॉफसह सिंधी मेघे रामनगर वर्धा जवळ सापळा रचून नाकेबंदी केली असता
एक मारुती सुझुकी रिट्झ कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एम. एच. – 04 इ.टी 2819- हे मिळुन आल्याने सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 1,08,850 /- रु. चा देशी विदेशी दारुसाठा मिळुन आला असता वाहन चालक 1) शुभम अरविंद धामंडे वय 28 वर्ष रा.रामनगर वर्धा, 2) अक्षय मनराज तिजारे वय 26 वर्ष रा. सिंधी मेघे यास ताब्यात घेवुन त्यास विचारपूस केली असता सदरचा दारुसाठा हा त्याने कुपचांदानी बारमालक, मोहन बार जरीपटका नागपुर यांचे बारमधुन विकत आणल्याचे सांगीतल्याने वरील वाहनात मिळुन आलेला १)1,08,850/- रु. चा देशी विदेशी दारुसाठा, २) आरोपीचे अंगझडतीतील नगदी 1850 / – रु., ३)एक अॅप्पल कंपनीचा आयफोन कि. 20,000 /- रु. ४) एक ओप्पो ए3 एस कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रू व 5 ) एक मारुती सियाझ चारचाकी वाहन क्र. एम.एच. – 04 इ.टी 2819 कि. 5,00,000/-रु. असा एकुण 06,08,850 /- रु. चा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक व बा मालकाविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकातील सपोनि. मंगेश भोयर, पोलिस
अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलिस स्टेशन रामनगर येथील पोलिस स्टॉफ यांनी केली.