
अवैधरित्या गांजाची विक्री करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…
अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यास सिंदी पोलिसांनी घेतले ताब्यात….
सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे बाबत कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले होते


त्याअनुषंगाने सिंदी रेल्वे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने या पोलिस पथकासह दिनांक ११/२/२४ चे संध्याकाळी ०४.३० ते ०६.३० वा चे दरम्यान शहरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती मिमीळाली की शहरातील वार्ड क्रमांक १ मधे आशिष रामटेके नावाचा ईसम अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी जवळ गांजा बाळगतो त्यावरुन सदर ठिकाणी जाऊन पाहनी केली असता सदरचा ईसम एका प्लास्टिक पिशवीमधे छोट्या छोट्या पाकीटात काहीतरी लोकांना देतांना दिसताच त्याचेवर छापा टाकला असता त्याचे ताब्यातुन प्लास्टिकच्या पिशवीमधे २८ लहान पाकीटे दिसली त्याचे वजन केले असता १५७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आला त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आशिष जागेश्वर रामटेके वय १९ वर्ष रा़ वार्ड क्र १ सिंदी रेल्वे ता़ सेलु असे सांगीतले त्यास ताब्यात घेऊन त्याचेवर पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे येथे अप क्रमांक 65/24 कलम 8(क),20(ब) एऩ.डि.पि.एस कायद्यान्वये
गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि श्यामसुंदर सुर्यवंशी पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे करीत आहेत

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे आदेशानुसार ठाणेदार वंदना सोनुने सहा.पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्यामसुंदर सुर्यवंशी,सफौ मनोहर चांदेकर,पोलिस हवा प्रशांत श्रीवास्तव,नापोशि सुरज सयाम,पोशि उमेश खामनकर,सचिन उईके,शुभांगी चाफले,मपोशि शालीनी नेहारे,ग्रेड पे चालक पोलिस उपनिरीक्षक विजय निकम यांनी केली
.



