हिंगणघाट येथील कुख्यात दारु विक्रेता टिनु याचे साथीदारास दारुसाठ्यासह घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कुख्यात दारुविक्रेता टिनु यांचे दारुचे मालाची विक्री करणारा डिबी पथकाचे ताब्यात,४.५ लाखाचा देशी दारुचा साठा केला जप्त…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अनुराग जैन रजेवरुन रुजु होताच त्यांनी सर्व प्रभारिंना अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दीपक वानखेडे हे डिबी पथकासह पोस्टे परिसरात दि. 26/07/2025 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की हिंगणघाट येथील कुख्यात दारु तस्कर व दारु विक्रेता टिनु गवळी ह्याने त्याचे साथीदाराचे मदतीने अवैधरित्या देशी दारुचा साठा करुन ठेवलाय







अशी गोपनीय माहीती पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हान यांना देऊन त्यांचे आदेशाने सपोनि दिपक वानखेडे हे गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार यांचेसह  रिंकू परचाके रा गोमाजी वॉर्ड,हिंगणघाट याचे घरासमोरील टिनाच्या बंद पाणठेल्या मध्ये देशी दारुचा साठा  टिनु उर्फ आकाश गवळी रा संत कबीर वॉर्ड हिंगणघाट याचे सोबत   संगनमताने  दारू विक्री करण्याचे उद्देशाने दारू साठा बाळगून लपवून ठेवलेला मिळुन आला सदर पानठेल्यामध्ये 1) रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या देशी दारूच्या बॉटल असलेले 25 खरड्याचे बॉक्स प्रति बॉक्स 100 बॉटल प्रमाणे 2500 बॉटल कि प्रति बॉटल शंभर रुपये प्रमाणे किं 2,50,000/-  रु.2) टॅंगो पंच कंपनीच्या देशी दारू ने भरलेल्या 90ml च्या बॉटल असलेले 20 बॉक्स प्रति बॉक्स 100 बॉटल प्रमाणे 2,000 बॉटल प्रति बॉटल शंभर रुपये प्रमाने 2,00,000/-  असा एकुन. 4,50,000/- रू चा दारुसाठा अवैधरित्या मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही मधील दोन्ही आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आला.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,उपविभागिय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक देवेद्र ठाकुर ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दीपक वानखेडे व डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रवीण बावणे, प्रशांत ठोंबरे, नापोशि राजेश शेंडे, नरेंद्र आरेकर, निलेश सूर्यवंशी, पोशि सागर सांगोले,संतोष गीते, मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे, आशिष नेवारे यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!