गावठी मोहा दारुची अवैध वाहतुक करणारे दोघे खरांगना पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गावठी मोहा दारुची चिल्लर विक्रीकरीता दुचाकीवरुन वाहतुक करणारे दोघे खरांगना डीबी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह मुद्देमाल जप्त……

खरांगणा(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षकांचे आदेशाने सर्व जिल्हाभर अवैध दारु विक्री विरोधात धाडसत्र सुरु आहे त्याअनुषंगाने अवैधरित्या मोहादारुची वाहतुक व विक्री करणार्यांवर कार्यवाही करण्याचे उद्देशाने पोलिस स्टेशन खरांगना येथील डी बी पथक पोलिस स्टेशन हद्दीत पेच्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की दोन ईसम निळ्या रंगाच्या मोटरसायकलने  काचनूर कडून हेटी रोडने खरांगण्याकडे गावठी मोहा दारूची वाहतूक करत आहे







अशा खात्रीशीर माहीतीवरुन हेट्टी ते खरांगणा रोडवर पुष्पा वाढई यांचे शेताजवळ नाकेबंदी करुन थांबले असताना दोन ईसम निळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीने येताना दिसल्याने त्यांना पंचा समक्ष थांबवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) नरेश सुरेश भोसले वय ३५ व २) सरदार सैबंग भोसले वय ३५ दोन्ही रा देलवाडी कारंजा घाडगे असे सांगीतले



यावरुन त्यांची तपासनी केली असता त्यांच्या दोघांच्या मध्ये ठेवून असलेल्या प्लास्टिक चुंगडीची पाहणी पंचा समक्ष केली असता प्लास्टिक चूंगळीमध्ये तीन मोठ्या प्लास्टिक पन्नीमध्ये मध्ये 30 लिटर गावठी मोहा दारू मिळुन आली जिची किंमत प्रति लिटर 200/ रुपये प्रमाणे किंमत 6000/ रुपये व एकनिळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच 31 ये ईबी 6934 किंमत एक 80000/ रु तसेच एक विवो कंपनीचा जुना वापरलेला मोबाईल किंमत 8000/ रु असा एकूण जुमला किंमत 94000/- रु. माल पंचा समक्ष मिळून आल्याने मोका जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन खरांगना येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव डॅा वंदना कारखैले,पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील ठानेदार पोलिस स्टेशन खरांगना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे, पोहवा मनीष श्रीवास, मनीष वैद्य पोशि अमर करणे, शंकर केंद्रे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!