स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला देवळी शहरात जाणारा देशी-विदेशी दारुचा साठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कार्यवाही, नाकेबंदी करुन कारसह देशी- विदेशी दारूचा 10,13,200/-रु चा मुद्देमाल केला जप्त….

वर्धी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केल्यानुसार सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/11/2024 रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन देवळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली एक गोल्डन रंगाची मारुती कंपनीची MH 01 AH.2148 नंबरची कार यवतमाळ मधील कळंब येथून देशी-विदेशी दारू चा साठा घेऊन नागपूर तुळजापूर महामार्गा वरून देवळी येथे जाणार आहे.





अशा मिळालेल्या गोपनीय माहिती वरून त्याच्यावर नागपूर तुळजापूर हायवेवर मौजा वाई फाटा येथे नाकाबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपी 1) जनार्दन नंदूजी बऱ्हाणपुरे वय 32 वर्ष रा. इंदिरा नगर देवळी जि. वर्धा 2) सुनील कुरसुंगे रा. इंदिरा नगर देवळी जि.वर्धा 3) प्रमोद धात्रक रा. इंदिरा नगर देवळी जि. वर्धा 4) महेश जैस्वाल देशी दारू व विदेशी दारू दुकान मालक रा. कळंब जि. यवतमाळ यांच्या ताब्यातून 30 खर्ड्याच्या खोक्यात देशी दारू गोवा कंपनीच्या 180 ml च्या 1440 सिलबंद शिश्या व 2 खोक्यात ऑफिसर चॉईस कंपनीच्या 72 सिलबंद शिशा एक गोल्डन रंगाची SX4 मारुती कंपनीची MH 01 AH 2148 क्रमांकाची कार असा एकूण 10,13,200/- रुपये चा मुद्देमाल जप्त करुन सदर ४ आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे प्राप्त आदेशानुसार  प्रभारी पोलीस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पो .हवा शेखर डोंगरे, आशिष महेशगौरी, पोशि विकास मुंडे,  सुगम चौधरी, शुभम राऊत. सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, यांनी  केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!