
वर्धा शहरात MD पावडरची विक्री करणारी टोळी,मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
वर्धा येथे एम.डी (मॅफेड्रॉन) पावडरची विकी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,३ ग्राम ७५० मिलिग्रॅम MD पावडर जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ व त्याच्या व्यसनाधीन होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे त्याअनुषंगाने अशा लोकांवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली की आज दिनांक 15 मे 2025 रोजी सिंदी मेघे वर्धा येथे राहणारा यश पराते हा दर्पण बंडे व आपले दोन साथीदारासह व्हाईट रंगाच्या एस क्रॉस कार क्र. एम.एच. 32 ए.एच 8601 या चारचाकी वाहनाने दर्पण बंडे याचे वाहनाने नागपुर येथे ‘एम.डी’ पावडर घेण्याकरीता काल रात्री नागपुर येथे गेले होते.


तसेच आज दिनांक 15/05/2025 रोजी सकाळचे सुमारास सिंदी मेघे, वर्धा येथील मटन मार्केट चौक, वर्धा येथे येणार आहे. तसेच सदर वाहनात यश पराते, दर्पण बंडे, विशाल बादलमवार व अंकुश तिरपुडे असे 4 जण आहे. त्यांचे गाडीत एम.डी (मॅफेड्रॉन) असुन ते एम.डी. ची नशा करतात व वर्धा येथे विकी सुध्दा करतात. अशा माहीतीवरुन. सिंदी मेघे, वर्धा येथील मटन मार्केट चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद ठिकाणी सापळा रचुन आरोपी क्र. 1) यश निलेश पराते, वय 25 वर्ष, रा. न्यु रेल्वे कॉलनी सिंदी (मेघे) वर्धा, 2) अंकुश गजानन तिरपूडे, वय 25 वर्ष, रा. गणेश मंदीरजवळ हिंद नगर वर्धा, 3) दर्पण अशोक बंडे, वय 29 वर्षे, रा. वार्ड नं. 3. वडगाव रोड, सेलु, जि. वर्धा 4) विशाल रमेश बादलमवार, वय 32 वर्षे, रा. सिंदी (मेघे) वर्धा यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर आरोपीचे ताब्यातुन एका प्लॉस्टीक जिप पॅकेटमध्ये फिक्कट पिवळसर रंगाची एम.डी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ पावडर वजन 3 ग्रॅम 780 मिलीग्रॅम, आरोपी यांचे 4 मोबाईल व एक मारूती सुझुकी कंपनिची एस क्रॅास कार असा एकुण 7,20,120/- रु. चा माल जप्त करण्यात आला.

सदरचा एम.डी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ आरोपी क्र. 05) शुभम नावाचा ईसम रा. नागपुर (पसार), यांचे कडुन आणल्याचे सांगीतले वरुन सदर आरोपीतांविरुध्द कलम 8 (क), 22 (ब), 29 एन.डी.पि.एस अॅक्ट 1985 अन्वये पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पसार आरोपी शुभम रा. नागपुर याचा स्था.गु. शा. वर्धा शोध घेत आहे.

सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक जमा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक, विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उपनि. बालाजी लालपालवाले,,सफौ. संतोष दरगुडे, हमिद शेख, नरेंद्र पाराशर, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पवन पन्नासे, नितीन ईटकरे, सागर भोसले, संघसेने कांबळे, मिथुन जिचकार, मुकेश ढोके, हर्षल सोनटक्के सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.


