अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर SDPO हिंगणघाट यांचे विशेष पथकाची कार्यवाही…
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे विशेष पथकाची अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर कार्यवाही…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात अवैघ धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी सर्व अधिकारी व प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस स्टेशन. गिरड हद्दीतुन एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी 800 गाडी क्र MH 34 AA 5029 ही देशी व विदेशी दारू ची मौजा कुडसंगी कडून मौजा कोरा कडे वाहतूक करून येत आहे
अशा गुप्त बातमीदाराचे मिळालेली माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकानी जावुन नाकेबंदी केली असता खबरेप्रमाणे एक सिल्वर रंगाची ची मारुती सुजूकी 800 गाडी क्र. एम एच 34 AA 5029 हे येतांना दिसली तिला पंच व पो स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडी थोड्या अंतरावर जाऊन थांबली पोलीस स्टाफ व पंच गाडीच्या दिशेने जात असता गाडी चालक हा गाडी सोडून पळून गेला सदर गाडीची पाहणी केली असता गाडीच्या मागील सीट वर 13 खर्ड्याच्या खोक्यात रॉकेट संत्रा देशी दारू व रॉयल स्टॅग विदेशी दारू चा माल गाडी सह एकुणकिं. 2,64,400/- रु.चा माल मिळुन आल्याने आरोपी MH 34 AA 5029 चा चालका विरुध्द पोलिस स्टेशन, गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे विशेष पथकातील पो.हवा. नरेंद्र डहाके,. अश्वीन सुखदेवे, पो.शि आकाश कांबळे . राकेश ईतवारे , यांनी केली.