अवैधरित्या विक्री करीता विदेशी दारुचा साठा शहरात आणतांना पोलिसांनी केली केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे पथकाने वर्धा शहरात येणारा विदेशी दारुचा साठा व चार चाकी कारसह ५,३८, २५० /- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला…

दिनांक ०५ / १२ /२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून आरोपी वैभव ज्ञानेश्वर किटे, वय ३० वर्ष, रा. पंजाब कॉलनी, वर्धा याचेवर आर्वी रोड, वर्धा येथे नाकेबंदी करून थांबवुन त्याच्या ताब्यातील वाहनाची पाहणी केली. त्याचे वाहनात वेगवेगळया कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या लहान मोठया शिश्या मिळुन आल्याने त्याबाबत त्यास विचारपुस केली असता त्याने सदर विदेशी दारू माल एम. पि. ट्रेडर्स कंळब, जि. यवतमाळ येथुन विक्री करण्या करीता आणल्याचे सांगितले त्याचे ताब्यातुन सुजुकी कंपनिची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. ४९ यु ७०४२ व विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिश्या असा एकुण जु. किं. ५,३८,२५०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात
आला. नमुद आरोपी व एम. पि. ट्रेडर्स कळंब, जि. यवतमाळ चा मालक यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात
आला आहे.
,
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशा प्रमाणे पोउपनी अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनिष कांबळे, पवन पन्नासे, प्रदिप वाघ, दिनेश बोथकर सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!