पोलिसांनी केलेल्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन,पोलिसांनी परत एक वर्षाकरीता केले हद्दपार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस  ठाणे बिटरगांव हद्दीतील इसम

यशवंत उर्फ बंडु चंपत देवकते रा. बिटरगांव





याचे वाढते गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्या करीता ठाणेदार बिटरगांव यांनी त्यास हद्दपार करणे संबधाने कलम ५६ (ब) म.पो.का. अन्वये चा प्रस्ताव पोलिस अधीक्षक  यवतमाळ यांचे मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास मा. उपविभागीय दंडधिकारी उमरखेड यांनी मान्यता देवुन त्यास सहा महिण्याकरीता  करीता हद्दपारीचे आदेश पारीत केले होते. त्यावरुन तो हद्दपार असतांना दिवाळी सनाला  कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन बिटरगांव येथील त्याचे घरी आला असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला प्राप्त झाली होती त्यावरुन स्था.गु.शा. कडील पथकाने यशवंत उर्फ बंडु चंपत देवकते रा. बिटरगांव यास त्याचे राहते घरुन ताब्यात घेवुन त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्याचे विरुध्द पो.स्टे. बिटरगांव येथे कलम १४२ म.पो. का व कलम १८८ भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंद करुन पो.स्टे. चे ताब्यात दिले आहे.



त्याचप्रमाणे पोलिस ठाणे आर्णी हद्दीतील इसम



शाहरुख खान कय्युम खान रा. शास्त्रीनगर आर्णी ता. आर्णी

याचा गुन्हेगारी अभिलेख सन २०२२ पासुन असल्याने व त्याचे विरुध्द शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, विनयभंग करणे,
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन अश्लील शिवीगाळ करणे असे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे पो.स्टे. आर्णी येथे नोंद असल्यामुळे व त्याने आर्णी शहर व परिसरात दहशत निर्माण केल्यामुळे ठाणेदार पो.स्टे. आर्णी यांनी त्यास कलम ५६(अ) (ब) म.पो.का. अन्वये हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्फतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी (एक तालुका) आर्णी यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावास मा. उपविभागीय दंडाधिकारी (एक तालुका) आर्णी यांनी मंजुरी देवुन त्यास एक वर्षे कालावधी करीता हद्दपार करणे
बाबतचे आदेश दिनांक ०८/११/२०२३ रोजी पारीत केले आहेत.
सदरची कार्यवाही ही डॉ.  पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक यवतमाळ,  पियुष जगताप, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात  आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ,  केशव ठाकरे, पोलिस निरीक्षक, पो.स्टे. आर्णी, सपोनि अमोल सांगळे, पोउपनि धनराज हाके, चापोउपनि रेवन जागृत, पोलिस अमंलदार बालाजी ठाकरे, राम पोपळघट, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, सुनिल पंडागळे सर्व स्थागुशा यवतमाळ, यांनी
यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!