पैशाची बॅग हिसकावणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस ठाणे घाटंजी हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन ३४,०००/-  रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई….

घाटंजी(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक २१/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घाटंजी पोलिस ठाणे हद्दीत पाहिजे फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय बातमीदाराकडुन खबर मिळाली की, २० ते २२ दिवसांपुर्वी पांढुर्णा रोड घाटंजी येथुन एका मुलाची पैशाची बॅग हिसकावुन चोरी करणारा धर्मशाळा वार्ड घाटंजी येथील अंकीत चटुले हा आहे. अशी खात्रीशीर खबर प्राप्त झाल्याने वरिष्ठांना प्राप्त माहिती बाबत माहीती करुन क्षणाचाही विलंब न करता माहिती प्रमाणे धर्मशाळा वार्ड घाटंजी येथुन अंकीत गणेश चटुले वय २४ वर्षे यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन दिनांक २३/०२/२०२३ रोजी पांढुर्णा रोड घाटंजी येथे केलेली जबरी चोरी त्याने त्याचा साथीदार नामे नितेश कलाने वय अं. २८ वर्षे, रा. घाटी (घाटंजी) याचे सांगणेवरुन त्याचेचसह केली
असल्याची पंचासमक्ष कबुली देवुन सदरचे जबरी चोरीतील २८,०००/-  रु त्याला मिळाल्याचे व उर्वरीत रक्कम व चोरलेला
मोबाईल हा नितेश कलाने याचे जवळ असल्याचे सांगीतले वरुन त्यास त्याचे जवळ असलेल्या पैशांबाबत विचारणा केली
असता त्याने चोरीचे पैशातुन ४ हजार रुपये खर्च झाले असल्याचे व चोरीच्याच पैशातुन एक सोन्याची बाळी घेतली असल्याचे
सांगीतले वरुन त्याचे कडुन चोरीच्या पैशातुन घेतलेली एक सोन्याची बाळी कि. १०,१००/- रु तसेच त्याचे घरझडतीमधुन
१३,९०० /- आणि घटनेवेळी त्याने वापरलेला मोबाईल असा एकुण ३४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन
त्याचा साथीदार नितेश गुलाब कलाने वय २८ वर्षे, रा. विद्याभवन वार्ड घाटी घाटंजी यास त्याची सासरवाडी ग्राम वाघोली
येथून ताब्यात घेतले आहे.





सदरील जबरी चोरी प्रकरणी पोलिस ठाणे घाटंजी येथे अपराध क्रमांक १५१/२०२४ कलम ३९२,३४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याने आरोपी १) अंकीत गणेश चटुले वय २४ वर्षे रा. धर्मशाळा वार्ड घाटंजी, २) नितेश गुलाब कलाने वय २८ वर्षे, रा. विद्याभवन वार्ड घाटी घाटंजी व जप्त मुद्देमाल पोलिस ठाणे घाटंजी यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलिस ठाणे घाटंजी यांचेकडुन सुरु आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ. आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात, सपोनि अमोल मुडे,पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!