
जिल्हा वाहतुक शाखेची नाकाबंदी करुन धडाकेबाज कामगिरी…
जिल्हा वाहतुक शाखेच्या नाकाबंदी दरम्यान दारू पिवून वाहन चालविणार्या 3 ईसमाविरुद्ध गुन्हे नोंद करुन मोटारसायकल केली जप्त तसेच 12 मोठ्या आवाजच्या बुलेट चे 12 सायलेंसरही केले जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि. 07 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरातील वेगवेगड्या मुख्य चौकात नाकाबंदी हि नेमण्यात आलेली होती, संध्याकाळी 08/00 वाजेच्या दरम्यान आर्वी नाका चौकात एका पल्सर मोटार सायकल वर ट्रिपलसीट एक चालक बेदरकार पणे अतिवेगाने पल्सर मोटार सायकल चालवितना वाहतूक पोलिसांना दिसून आला



त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो मोटार सायकल घेवून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळ जावून तोंडाचा वास घेतला असता ते दारू पिल्याचा वास येत होता त्यावरून त्या तिन्हि मोटार सायकल वरील इस्माना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) नागेश जानरावं फुलझेले 2)सागर गणेश गेडाम 3) अर्चित चंदुजी उईके सर्व रा इतवारा वर्धा असे सांगीतले

त्याची वैद्यकिय तपासनी केली असता त्यांनी दारुचे सेवन केले असल्याचे डॉक्टर यांनी सर्टिफिकेट दिल्याने वरील तिन्हि आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85(1), मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंद करून त्याची मोटारसायकल हि जप्त करण्यात आलेली आहे

तसेच मोठ्या शहरात कर्णकर्कश आवाजचे सायलेंसर विनापरवानगीने मॉडिफाईड केलेले सायलेंसर लावून बुलेट चलविनारे 12 बुलेट चालक यांचे मोठ्या कर्णकर्कश आवाजचे सायलेन्सर ज्यांमुळे इतर सामान्य जनतेला त्रास होतो असे सायलेंसर हे मोटार वाहन कायदा कलम 194 अन्वये कार्यवाही करून तसेच तपासणी करून जप्त करून काढण्यात आलेले आहेत.
तरी वाहन चालकांना आवाहन आहे की मद्यसेवण करून दारू पिवून कोणतेही वाहन हे रोडवर चालवू नयेत, आपले लायसन्स, मूळ कागदपत्र सोबत ठेवावे. मोठया आवाजचे सायलेंसर मॉडिफायड केलेले अल्टरनेट केलेले सायलेंसर बिनापरवाना वापरू नयेत अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे आवाहन करण्यात येत आहे



