कळंब पोलिसांनी हस्तगत केली चोरीस गेलेले दुचाकी वाहन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कळंब(यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कळंब यवतमाळ येथे दि.०९/११/२०२३ रोजी फिर्यादी

नितेश रामदास केराम वय ३६ वर्षे रा-डोंरगखर्डा





यांनी रिपोर्ट दिला, दि. ०६/११/२०२३ रोजी रात्री ०९.३० फिर्यादी यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोटारसायकल एम एच ३० एडी ७२१४  अॅदाजे किंमत २५०००/-₹ ही ग्राम डोंगरखर्डा येथील त्यांची आत्या निर्मला येरमे यांचे घरासमोर उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली अशा फिर्यादी यांचे तोंडी तक्रारीवरुन पोलिस स्टेशन  कळंब येथे अप क ५१७ / २०२३ कलम ३७९ भादंवी चा नोंद करण्यात आला होता व त्याचा तपास
कळंब पोलिस करीत असतांना दरम्यान पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहेकॉ गजानन धात्रक  हे ग्राम डोंगरखर्डा येथे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचे वाहन हे



सतिश नारायण वाढवे वय ३४ वर्षे 



सुभाष चरणदास कोवे वय ४६ वर्षे

यांनी चोरी केले आहे. वर नमूद दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदर वाहन हे रात्री अं १०.३० वा चे दरम्याने डोंगरखर्डा येथून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून
त्यांना सदर गुन्हयात अटक करून गुन्हयात चोरी गेलेली अॅक्टीव्हा एम एच ३० एडी ७२१४ हि अटक आरोपीतांकडून जप्त करण्यात आली.
सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक  पवन बन्सोड, अपर पोलिस
अधिक्षक, पियूष जगताप ,उपविभागीय पोलिस अधिकारी ,संजय पूजलवार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिपमाला भेंडे यांचे नेतृत्वात पोउपनि आशिष शिंदे, पोहेकॉ गजानन धात्रक ,पोहेकॉ संजय वाघाडे , पोना निर्मल राठोड  यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!