
पोलिस स्टेशन राळेगाव हद्दीत शेतातील पिंकामधे चोरुन लपुन गांजाची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….
राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी- सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयातुन अंमली पदार्थाचे समुळ नायनाट करण्याचे उददेशाने पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांचे संकल्पनेतुन यवतमाळ जिल्हयात नशामुक्त पहाट’ हे अभियान राबवुन जिल्हयातील तरुणाईला अंमली पदार्थाचे विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करित असुन त्या अनुषंगानेच जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाची लागवड, वाहतुक, विक्री, सेवन होणार नाही याबाबत कारवाई करणेकरीता पोलिस अधीक्षक यांनी अधिनस्थ पथकांना आदेशित केले असल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अंमली पदार्थाविरुध्द कारवाई करणेकरीता दिनांक ०४/११/२०२३
राळेगांव परिसरात पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन खबर मिळाली की, पोलिस स्टेशन राळेगांव
हददीतील ग्राम गोपालनगर येथे इसम नामे शंकर गणपत काळे याने त्याचे शेतात विक्री करण्याचे उददेशाने अवैधरित्या गांजा
हया अंमली पदार्थाचे झाडाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. अशा खबरेवरुन NDPS कायदयातील कायदेशीर
बाबींची पूर्तता करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खबरेतील नमुद घटनास्थळी पाहचुन खबरेत नमुद इसमाचे शेतात जावुन
पाहणी केली असता शेतात एक इसम हजर मिळाला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव
शंकर गणपत कारे (काळे) वय ६० वर्षे रा. गोपालनगर ता. राळेगांव


असे सांगीतले. त्यास विचारपुस केली असता सदरचे शेत त्याचेच
मालकीचे असल्याचे सांगीतले वरुन कायदेशीररित्या त्याचे शेताची पाहणी केली असता शेतात कापुस व तुर हया पिकांची
लागवड केलेली असुन तुरीचे उभ्या पिकामध्ये गांजा हया अमंली पदार्थाच्या झाडांची लागवड केलेली आढळुन आली. शंकर
काळे यास सदरची झाडे कशाची आहे याबाबत विचारणा केली असता त्याने गांजा हया वनस्पतीची असल्याचे सांगीतले वरुन
गांजाचे झाडांची मोजणी केली असता एकुण ६० झाडे लागवड केली असल्याचे आढळून आले वरुन सदर गांजाच्या झाडांची
पाने व खोडे वेगवेगळी करुन वजन केले असता गांजाच्या झाडाचे खोडाचे एकुण वजन २३,२८० ग्रॅम पाने, शेंडे व फुले यांचे वजन १६ किलो ८४० ग्रॅम ज्यांची किंमत ५०००/- किलो प्रमाणे एकुण ८४,०००/- रुपये चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला व आरोपी नामे शंकर गणपत कारे (काळे) वय ६० वर्षे रा. गोपालनगर ता. राळेगांव जि. यवतमाळ याचे विरुध्द पोस्टे राळेगांव येथे NDPS कायदयाअन्वेय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्था. गु.शा. रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक, पो.स्टे. राळेगांव, सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, विवेक देशमुख, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके, विवेक पेठे सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच पो.स्टे. राळेगांव येथील पोलिस अंमलदार गणेश हुलके, रुपेश जाधव, सुरज गावंडे यांनी यशस्वीरित्या पार
पाडली आहे.



