आर्वी येथील कुख्यात गुंड तसेच दारुविक्रेता याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

आर्वी हद्दीतील गुंड प्रव्रुत्तीचा दारुविक्रेता शुभम माने यांचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई….

आर्वी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात होणाऱ्या ग्राम पंचायत, जिल्हा परीषद निवडणुका निर्भीड व शांततापुर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अवैधरीत्या दारुचे धंदे करणाऱ्या दारुविक्रेत्यावर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्री. नरेन्द्र फुलझेले, तसेच  पोलीस अधीक्षक, वर्धा अनुराग जैन, यांनी दिलेले होते





त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन, आर्वी हद्दीतील कुख्यात गुंड तथा दारुविक्रेता शुभम संजय माने वय २७ वर्षे रा. हनुमान वार्ड, आवीं याचे विरुध्द पोलिस स्टेशन, आर्वीचे अभिलेखावर सन २०१७ पासुन शरीरा विरुध्द तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण २५ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये अवैद्यरित्या घातक शस्त्र बाळगणे, अपहरण करणे, शस्त्र बाळगुन गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अश्लिल शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे, अवैद्यरित्या दारुची विक्री करणे, अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी ०८ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ०८ ते ०९ वर्षापासुन नमुद आरोपी शुभम संजय माने रा. हनुमान वार्ड आर्वी याने पोलीस स्टेशन, आर्वी परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते.



त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनिक जनजिवन विस्कळीत झाले होते. शुभम संजय माने याच्या कृत्यांमुळे पोलिस स्टेशन, आर्वी अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचे व त्याचे गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने त्याचे विरुध्द सन-२०२२ मध्ये कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ तसेच कलम ११० (ई) फौजदारी प्रकींया संहीता अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.



त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव . पोलिस अधिक्षक अनुराग जैन, यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिहाधिकारी, वर्धा . नरेन्द्र फुलझेले यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिहाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २९ मे २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.सन – २०२४ मध्ये वर्धा जिल्हयातील एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आलेले आहेत तसेच सन-२०२५ मध्ये अद्याप पावेतो ०९ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ.सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी आर्वी. डी. खंडेराव पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विनोद चौधरी,ठाणेदार पो.नि. सतिश डेहणकर, पोलिस स्टेशन, आर्वी पोहवा अमोल आत्राम, आशिष महेशगौरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोहवा विनोद मस्के पोलीस स्टेशन, आर्वी यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!