
बार्शीटाकळी पोलीसांचा जुगारावर छापा,६ जुगारींसह २ लाखाचेवर मुद्गेमाल जप्त…
जुगार अड्ड्यावर धाड ६ आरोपी कडुन २,३२,७०० रु चा मुद्देमाल जप्त
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणे करीता ” ऑपरेशन प्रहार” मोहीम सुरु केली असुन त्यानुसार अवैध धंदयावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश अकोला जिल्हयातील सर्व प्रभारींना देण्यात आले आहेत.



त्याअनुषंगाने दि २१ जुन २०२५ रोजी बार्शीटाकळी पोलिसांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस स्टेशन बार्शीटाकळी हद्दीतील ग्राम सिंदखेड येथे काही ईसम जुगार खेळताय अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन पथकाने ग्राम सिंदखेड येथील जुगार अड्यावर दुपारी ३.३० वा. चे दरम्यान धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी १) सुरेश उत्तम वानखडे, वय ४५ वर्ष, २) नंदगोपाल गुलाबराव आगरकर, वय ४९ वर्ष, ३) जितेंद्र प्रल्हाद वानखडे, वय ५५ वर्ष, ४) सोपान डिगांबर काळदाते, वय ३६ वर्ष, ५) हरीभाउ निंबाजी इंगळे, वय ६८ वर्ष, ६) डिगांबर ओमकार वानखडे, वय ५० वर्ष, सर्व रा. सिंदखेड ता. बार्शिटाकळी हे जुगार खेळतांना मिळुन आले यांचे ताब्यातुन नगदी ५०३०/- रु, ५ मोबाईल कि अ ४७,०००/- रु, घटनास्थळावरुन नगदी ६७०/- रु व ४ मोटर सायकल कि.अ. १,८०,०००/- रु असा एकुण २,३२,७०० रु मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आकोट अनमोल मित्तल,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस स्टेशन बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन बार्शीटाकळी चे पोहवा मंगेश महाजन, पोशि योगेश पडवळ, पोशि मनिष घुगे,ईश्वर पातोंड,गोींद सपकाळ, गणेश पाटील,मस्के यांनी केली आहे.




