ॲटोरिक्षाची अमरावती शहरातुन चोरी करुन विकणारा अट्टल चोरट्यास युनीट १ ने नागपुर येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहरातुन ऑटोरिक्षा चोरणारा अट्टल चोरट्यास गुन्हे शाखा, युनिट १ ने नागपुर येथुन घेतले ताब्यात, दोन ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे केले उघड……

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५ एप्रिल २०२५ रोजी नागपुरी गेट येथे राहनारे अब्दुल अन्सार अब्दुल रहेमान यांनी पो.स्टे. नामपूरीगेट येथे तक्रार दिली कि, त्यांचे मालकीचा ऑटोरिक्षा क्रमांक MH 27-BW-2724 किंमत अंदाजे ९६,०००/-रु. चा गवळीपुरा, अमरावती येथून दि १२/०४/२०२५ रोजी रात्री दरम्यान अज्ञात चोराने चोरुन नेला.अशा त्याचे तक्रारीवरुन पो.स्टे. नागपूरीगेट येथे अप क्र १२२/२०२५ कलम ३०३ (२) बि.एन.एस. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता







तसेच दुसर्या एका गुन्ह्यात दि १६/०५/२०२५ रोजी नालसाबपूरा, अमरावती येथे राहनारे तक्रारदार शहीद खान सत्तार खान, वय २३ वर्षे,  यांनी तक्रार दिली की, त्यांचे मालकीचा ऑटोरिक्षा किंमत अंदाजे १,५०,०००/-रु. चा दि. १५/०५/२०२५ चे रात्रीदरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेला, अशा फिर्यादीवरुन पो.स्टे. खोलापूरीगेट येथे अपराध क्रमांक ७४/२०२५ कलम ३०३ (२) बि.एन. एस. प्रमाणे गुन्हा नोंद होता



१ महीन्याचे अंतराने असे दोन ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने सदर गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे शाखा, युनिट कं.०१, अमरावती शहर करीत होते. गुन्हे शाखा, युनिट क्रं.०१ अमरावती शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून व फिर्यादी यांची भेट घेवून ऑटोरिक्षा चोरीच्या घटनांची माहिती घेतली तसेच गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती काढली असता सदरचे ऑटोरिक्षा हे नागपूर येथे चोरुन नेल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीवरुन गुन्हे शाखा, युनिट कं.०१ सातत्याने पाठपुरावा करीत होते.तसेच समांतर तपास करीत असतांना पो.स्टे. नागपूरीगेट येथून ऑटोरिक्षा चोरी करणारा शेख राजा शेख बाबा, वय २१ वर्षे, रा. बडाताजबाग, नागपूर हाच असल्याचे निष्पन्न झाले. परंतु नमुद आरोपी हा आपली ओळख लपवून राहात होता यामुळे गुन्हेशाखा, युनिट १  चे अधिकारी व अंमलदार हे हे मागील १ महिन्यापासून त्याच्यावर पाळत ठेवून होते व सतत आरोपीबाबत माहिती मिळवित होते.



त्यानुसार सदर  ईसम हा नागपूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. अशा माहिती वरुन गुन्हे शाखा, युनिट १ चे पथक नागपूर येथे खाना झाले. गुन्हे शाखा, युनिट १ चे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २८/०७/२०२५ रोजी नागपूर येथे जावून नमूद आरोपीस शिताफिने अंबाझरी, नागपूर परिसरातून ताब्यात घेतले. व शेख राजा शेख बाबा यास ऑटोरिक्षा चोरीबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने नागपूरीगेट पोलिस स्टेशन येथील दाखल ऑटोरिक्षा चोरीची कबूली दिली तसेच याव्यतिरिक्त आणखी एक ऑटोरिक्षा नालसाबपूरा, अमरावती येथून चोरी करुन नागपूर येथे नेल्याची कबूली दिली. वरुन गुन्हे शाखा, युनिट १, ने  नमूद आरोपीस  ताब्यात घेवून अमरावती येथे आणले व पुढील तपासकामी पोलिस स्टेशन नागपूरी गेट  यांचे ताब्यात दिले व  दोन ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे उघड केले.

सदरची कामगिरी ही  पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, पोलिस उपआयुक्त (परिमंडळ ०१). गणेश शिंदे, पोलिस उपआयुक्त (परिमंडळ ०२). शाम घूगे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे विभाग)शिवाजी बचाटे,सहायक पोलिस आयुक्त (गाडगेनगर विभाग)  अरुण पाटिल सहायक पोलिस आयुक्त (राजापेठ विभाग) जयदत्त भंवर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे  वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि इम्रान नाईकवडे, पोहवा फिरोज खान, सतीष देशमूख,सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, नाईक पोलीस अमंलदार नाझीमउददीन सैयद, विकास गुढधे, सचिन भोयर, सुरज चव्हाण, निखील गेडाम, रंजित गावंडे, चालक- पोहवा अलिमोद्दीन खतिब, चालक पो.कॉ. किशांर खेंगरे, अशोक खंगार नेमणूक गुन्हे शाखा युनिट क्रंमाक -०१ यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!