मंदिरातील अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला; आरोपीला अटक, मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती :- शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू पुष्पक कॉलनी येथील एका मंदिरातून अष्टधातूची मौल्यवान पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई शांततेत आणि वेगाने या प्रकरणाचा तपास केला.२४ तासांच्या तासांच्या आत आरोपीला अटक केली असून, चोरीला गेलेली मूर्ती देखील हस्तगत केली आहे. .

नेमकी घटना काय?

फिर्यादी अरविंद केशवराव डबरे (वय ५० वर्ष, व्यवसाय: ऑटो चालक व मंदिराचे सचिव, रा. न्यू पुष्पक कॉलनी, अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे मंदिर उघडून पूजा केली होती. या मंदिरातील शंकरजींच्या पिंडीवर लोकवर्गणीतून तयार केलेली ७,००० रुपये किमतीची अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती बसवण्यात आली होती.



सकाळी पूजा करताना आणि त्यानंतर कॉलनीतील नागरिक दर्शनासाठी आले तेव्हा मूर्ती मंदिरातच होती. मात्र, संध्याकाळी ६:०० वाजताच्या सुमारास जेव्हा कॉलनीतील लोक पुन्हा मंदिरात गेले, तेव्हा त्यांना ती पंचमुखी नागाची मूर्ती जाग्यावर दिसली नाही. मूर्ती चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली.

संशयावरून आरोपीला अटक आणि गुन्ह्याची कबुली

फिर्यादी यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी दिपक शंकरराव मारवाडी (वय ३४ वर्ष, मूळ रा. अण्णाभाऊ साठेनगर, हातगाव, जि. अकोला, सध्या रा. पुष्पक कॉलनी, अमरावती) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ (ड) अंतर्गत गुन्हा रजि. नं. १९३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला.



तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी ११ जून २०२६ रोजी रात्री २३:५४ वाजता आरोपी दिपक मारवाडी याला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला १३ जून २०२६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी (PCR) सुनावली. पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता, आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेली ७,००० रुपये किमतीची अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती यशस्वीरीत्या हस्तगत केली असून गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

सदर यशस्वी कारवाई अमरावती शहराचे माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (राजापेठ विभाग) संजय खताळे आणि खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक वंजारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खैरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र कोठेकर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज अंभोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!