देवलापार पोलिसांची मोठी कारवाई: १२५ किलो गांजासह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

देवलापार पोलिसांची मोठी कारवाई: १२५ किलो गांजासह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

देवलापार: नागपूर ग्रामीणच्या देवलापार पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. दिनांक २६ जून २०२६ रोजी केलेल्या एका धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १२५.६६५ किलोग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी होंडा सिटी कार असा एकूण ३५,१३,३०० रुपयांचा (३५ लाख १३ हजार) मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक   हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक  अनिल म्हस्के, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (रामटेक) श्री. रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

देवलापार: नागपूर ग्रामीणच्या देवलापार पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. दिनांक २६ जून २०२६ रोजी केलेल्या एका धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १२५.६६५ किलोग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी होंडा सिटी कार असा एकूण ३५,१३,३०० रुपयांचा (३५ लाख १३ हजार) मुद्देमाल जप्त केला आहे.



अचानक नाकाबंदी आणि पोलिसांचा संशय

२६ जून २०२६ रोजी देवलापार पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी जुन्या देवलापार पोलीस स्टेशन समोर अचानक नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून गांजाची अवैध वाहतूक केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस दबा धरून सापळा रचत असतानाच, रात्री सुमारे ०२:१० वाजताच्या सुमारास एक सिल्वर रंगाची संशयास्पद कार नाकाबंदीच्या दिशेने येताना दिसली.



चित्रपटासारखा पाठलाग आणि आरोपीचा पलायन

नाकाबंदीजवळ आल्यावर कार चालकाने पोलिसांना पाहिले आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्याने नाकाबंदीपासून काही अंतरावरच गाडी वळवली (यु-टर्न घेतला) आणि जबलपूरच्या दिशेने वेगाने पळवून नेली.

पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लागल्याचे पाहून कार चालकाने मानेगाव टेक जवळ आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर त्याने कार लॉक केली आणि अंधाराचा फायदा घेऊन जवळच असलेल्या जंगलात पळ काढला.



कारच्या डिक्कीत सापडला साठा

पोलिसांनी तात्काळ पंचांना घटनास्थळी पाचारण केले. पंचांसमक्ष कारचे लॉक तोडून गाडीची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीमध्ये एकूण १२६ पाकिटे आढळून आली. या पाकिटांची तपासणी केली असता त्यात १२५.६६५ किलोग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:



  • गांजा: १२५.६६५ किलो (किंमत अंदाजे २५,१३,३०० रुपये)

  • वाहन: होंडा सिटी कार, क्रमांक – UP 16 AP 2043 (किंमत अंदाजे १०,००,००० रुपये)

  • एकूण जप्त मुद्देमाल: ३५,१३,३०० रुपये

एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी अज्ञात फरार आरोपीविरुद्ध देवलापार पोलीस स्टेशन येथे कलम ८(क), २०(ब)(ii)(सी) एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस साखळी पुरावे जोडून या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक

कारवाईचे थेट नेतृत्व देवलापार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक  नारायण तुरकुंडे यांनी केले. या पथकात पोउपनि अमोल तांबे, मपोउपनि वर्षा गायकवाड, पोहवा विजय बिसेन, रवि मेश्राम, पोना शिवा नागपुरे, तुषार खडसे, पो.अ. केशव फड, सचिन येळकर, चापोहवा जिवन आणि होमगार्ड सैनिक सहभागी होते.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!