राजापेठ पोलिसांची जुगारावर धडक कारवाई: ५ आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दिनांक २७ जून २०२६ रोजी राजापेठ पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जुना सातुर्णा एमआयडीसी (MIDC) परिसरातील मेहेरबाबा कॅन्टीन येथे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला.

कारवाईची मुख्य माहिती:



  • या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • अटक केलेले आरोपी: पोलिसांनी एकूण ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे:



    1. ऋषीकेश शिवदास शिंदे (वय २७, रा. सरोज कॉलणी)

    2. शेख नाजीम शेख नबी (वय २७, रा. रतनगंज)



    3. मोहम्मद साबीर मोहम्मद छोटु (वय २७, रा. हनुमान नगर)

    4. वल्लभ भगवानदास जाधव (वय २५, रा. झेडा चौक)



    5. सत्यम प्रमोदराव राऊत (वय ३०, रा. सरोज कॉलणी)

  • जप्त मुद्देमाल: या कारवाईदरम्यान ५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • तपास: या गुन्ह्यातील इतर ३ संशयित आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

    पोलीस पथक आणि मार्गदर्शन

    ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (राजापेठ विभाग) संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि नितीन शिंदे, तसेच पोलीस अंमलदार मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवि लिखीतकर, अंकुश काळे, प्रशांत बेलोकर, अमोल खंडेझोड, आकाश यादव आणि अर्जुन कदम यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!