
आसेगाव पूर्णाचे ठाणेदार सूरज तेलगोटे सन्मानित!
आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे ‘उत्कृष्ट ठाणेदार’ पुरस्काराने सन्मानित! उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष गौरव!
अमरावती:

कर्तव्यदक्षता, चोख बंदोबस्त आणि गुन्हेगारी नियंत्रणात नेहमीच अग्रेसर असणारे आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले आहे. जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या पहिल्या सहामाहीत (अर्धवार्षिक) आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि संपूर्ण पोलीस स्टेशनच्या कामकाजात त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत दिनांक १३ जुलै २०२६ रोजी अमरावती ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड सर यांच्या हस्ते ठाणेदार सूरज तेलगोटे यांना सन्मानचिन्ह (मोमेंटो) आणि प्रशस्तिपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

टीमवर्कचे यश:
आपल्या या सन्मानाबद्दल बोलताना ठाणेदार सूरज तेलगोटे म्हणाले, “हा सन्मान म्हणजे केवळ एका अधिकाऱ्याचा गौरव नसून, आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मेहनतीचे आणि अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जनसेवेचे फलित आहे.”

ठाणेदार सूरज तेलगोटे यांच्या या यशाबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल सध्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस पोलीस प्रशासनासह नागरिकांकडूनही खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत.





