अमरावती ग्रामीण पोलिसांचा दणका: दर्यापुरात अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती :-

दर्यापूर येथील बनोसा भागात अवैध देशी आणि विदेशी दारूचा साठा बाळगणाऱ्यांवर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १,६०,४३५ रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.



कारवाईची पार्श्वभूमी

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध देशी व विदेशी दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.  त्यानुसार, २५ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दर्यापूर-अंजनगाव सुर्जी उपविभागात गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की, बनोसा येथील प्रणय बिहाडे हा त्याच्या राहत्या घरामागील गोदामात विक्रीच्या उद्देशाने अवैध व विनापरवाना देशी-विदेशी दारू बाळगून आहे

धाड आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित गोदामावर धाड (Prohibition Raid) टाकली. या कारवाईदरम्यान गोदामातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:



  • देशी दारू: खाकी रंगाचे १७ बॉक्स – अंदाजे किंमत ₹६७,८४०/-

    विदेशी दारू: खाकी रंगाचे १० बॉक्स – अंदाजे किंमत ₹९२,५९५/-



    एकूण जप्त मुद्देमाल: २७ पेट्या दारू – एकूण किंमत ₹१,६०,४३५/-

    जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन दर्यापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



आरोपींची नावे

१. प्रणय सुरेशराव बिहाडे (वय ४७ वर्षे, रा. गांधी नगर बनोसा, दर्यापूर)

२. संतोष ओमप्रकाश बरडे (वय ४४ वर्षे, रा. बाभळी, दर्यापूर)

३. आकाश संजय कपिले (वय २९ वर्षे, रा. गांधी नगर बनोसा, दर्यापूर) ४. नितीन बिहाडे (रा. दर्यापूर) – (फरार)

कारवाई करणारे पोलीस पथक

ही यशस्वी कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने, अप्पर पोलीस अधीक्षकदत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पार पडली.

या कारवाईत पो.उ.नि. सतीश झाल्टे, पो.उ.नि. आकाश शिवणकर, तसेच पो.हवा. चेतन दुबे, दिनेश कनोजिया, सचिन गायधने, प्रशांत वैद्य, आणि चालक हर्षद घुसे यांनी सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!