अकोला: निष्काळजी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; खदान पोलिसांकडून २ १८ वर्षीय तरुणांना अटक, मारुती कार जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला: खदान पोलिसांची धडक कारवाई; मोहसीन खान यांच्या अपघात प्रकरणातील २ आरोपींना अटक, २ फरार

अकोला:



अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर रस्ता अपघाताच्या प्रकरणात खदान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

२३ जुलै २०२६ रोजी दुपारी २:२० वाजेच्या सुमारास मोहसीन शेख समद (वय ३८ वर्ष, रा. आझाद कॉलनी, अकोला) हे त्यांच्या सुझुकी ॲक्सेस मोपेड गाडीने (विना नंबर) जात होते. दरम्यान, कौलखेड परिसरामध्ये मारूती सुझुकी कंपनीच्या इंग्रिस (कार क्र. MH 30 BW 1237) या चारचाकी वाहनाच्या चालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवून मोहसीन खान यांच्या मोपेडला पाठीमागून जोरदार धडक (ठोस) दिली.



या अपघातात मोहसीन खान हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास व मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३० पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून आरोपींचा शोध

अपघातातील आरोपी व वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने पथक तयार केले. अकोला शहर आणि खदान पोलीस ठाण्याच्या परिसरातील ३० हून अधिक सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांच्या फुटेजची अत्यंत सूक्ष्म पाहणी करण्यात आली. या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी एकूण ४ आरोपींपैकी २ मुख्य आरोपींना निष्पन्न करून अटक केली.



अटक करण्यात आलेले आरोपी:

१. सोहन उर्फ पृथ्वीराज आनंद काळे (वय १८ वर्ष, रा. कौलखेड रिंग रोड, अकोला)

२. आर्यन सुभाष पाटकर (वय १८ वर्ष, रा. कौलखेड, अकोला)



जप्त मुद्देमाल: गुन्ह्यात वापरलेली मारुती इंग्रिस गाडी (MH 30 BW 1237) – अंदाजे किंमत ₹२,५०,०००/- (अडीच लाख रुपये) जप्त करण्यात आली आहे.

मार्गदर्शक व कारवाई करणारे पोलीस पथक

ही धडक कारवाई अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग)  सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

  • श्री. मनोज केदारे (पोलीस निरीक्षक, पो.स्टे. खदान)

  • विजय इंगळे (उपनिरीक्षक)

  • पोहेका  निलेश खंडारे, भुषण मोरे, अभिमन्यु सदाशिव

  • पोहवा जय मंडावरे

  • पोकॉ   वैभव कस्तुरे, मंगेश खेडकर, शिवम दुबे (सर्व पोलीस स्टेशन खदान, अकोला)







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!