जवाहरनगर पोलिसांची कामगिरी; ‘CEIR’ पोर्टलच्या साहाय्याने नागरिकांना परत मिळाले हरविलेले मोबाईल

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


जवाहरनगर पोलिसांकडून ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या साहाय्याने हरविलेले मोबाईल परत; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

सविस्तर बातमी:-

  • घटना व ठिकाण: भंडारा जिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या जवाहरनगर पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. भंडारा जिल्हा पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले आहे.





  • कारवाई कशी केली?:  नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती आणि ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलवर त्याची नोंदणी केली होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत जवाहरनगर पोलिसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक शोध घेतला.



  • मोबाईल सुपूर्द:  शोध मोहिमेदरम्यान ट्रेस केलेले विविध कंपन्यांचे मोबाईल, उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा यांचे तेजस सारडा व पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या हस्ते, जवाहरनगर पोलीस स्टेशन येथील 05 मोबाईल धारकांना प्रत्यक्ष परत करण्यात आले.



  • मार्गदर्शन:  ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक  नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक  निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. भीमाजी पाटील व पो.नि. सतीश बनसोड यांच्या सायबर पथकाकडून पार पाडण्यात आली.

  • पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:  नागरिकांचे मोबाईल हरवल्यास त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी आणि www.ceir.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी, जेणेकरून तांत्रिक साहाय्याने मोबाईलचा शोध घेणे सोपे जाईल, असे आवाहन भंडारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!