
नागपूर-वर्धा दारूची अवैध वाहतूक सेवाग्राम पोलिसांकडून उद्ध्वस्त; १६.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूरवरून वर्धा शहरात होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक सेवाग्राम पोलिसांनी यशस्वी कारवाई करत उद्ध्वस्त केली आहे. पवनार येथील बस स्टँडसमोर रचलेल्या नाकेबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी एकूण १६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
विदेशी दारू: २८ पेट्यांमध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹३,७३,६००/-)

चारचाकी वाहन: हुंदाई क्रेटा कार (किंमत ₹११,००,०००/-)
इतर साहित्य: २ मोबाईल फोन (किंमत ₹१,४०,०००/-)

एकूण जप्त मुद्देमाल: ₹१६,१३,६००/- (सोळा लाख तेरा हजार सहाशे रुपये)
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे:

-
इरफान कलीम तगाले (वय २३ वर्षे, रा. वॉर्ड क्र. १७, स्टेशन फैल, वर्धा)
आदील इस्राईल शेख (वय २६ वर्षे, रा. वॉर्ड क्र. १७, स्टेशन फैल, वर्धा)

सदर यशस्वी कारवाई वर्ध्याचे पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील मंडलिक यांच्या निर्देशांनुसार करण्यात आली.




