
नागपुरात अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची कारवाई; चौघांवर गुन्हा दाखल
नागपूरच्या माउं ट रोड (सदर) येथील “नो व्हेअर कॅफे” येथे बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ४५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील

-
कारवाईची तारीख व वेळ: १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास.
-
ठिकाण: ‘नो व्हेअर कॅफे’, बुटी कम्पाउंड, माउंट रोड, सदर पोलीस ठाणे हद्द, नागपूर.

-
कारवाईचे कारण: कॅफे मालकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू केले होते.
आरोपींची नावे

१. गौरव श्रीराम बोकडे (वय ३३ वर्षे) – कॅफे चालक व मालक (रा. प्लॉट नं. १४, ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा रोड, नागपूर)
२. परेश मदन सोरते (वय २० वर्षे) – कॅफेतील वेटर (रा. निकालस मंदिर, इतवारी, नागपूर)

३. वैभव श्रीकृष्ण देवहाते (वय ३४ वर्षे) – ग्राहक (रा. २०३, तुळशी बिहार, जयताळा, नागपूर)
४. मोहम्मद इत्तेफाक वल्द मोहम्मद शकील (वय २८ वर्षे) – ग्राहक (रा. किल्ला रोड, महाल, नागपूर)
जप्त केलेला मुद्देमाल
-
विविध फ्लेवर्सचा तंबाखू
-
हुक्का पॉट व इतर साहित्य
(एकूण किंमत: ₹४५,५००/-)
कायदेशीर कारवाई
या सर्व आरोपींविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ (महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८) मधील कलम ४(१) आणि २१(१) अन्वये सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस पथक :-
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दिपक अग्रवाल आणि सह. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मपोनि. शुभांगी देशमुख, पोउपनि. मनोज राऊत, सफौ. गजेंद्रसिंग ठाकूर, पोहवा. विजय यादव, कमलेश गणेर, प्रविण शेळके, नापोअं. सुरेश तेलेवार, पोअं. मंगल जाधव व आशिष धंदरे यांनी केली.




