
एम.आय.डी.सी. परिसरात चाकुचा धाक दाखवून जबरदस्ती चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, तीन गुन्हे उघडकीस
घटनेची पार्श्वभूमी
-
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे प्रेम दीपक कोल्हे (वय १८, रा. जि. अकोला) हे दि. १९.०७.२०२६ रोजी रात्री ९:३० वाजता मारोती पेवर्स, एम.आय.डी.सी. क्र. ४, अकोला येथे रस्त्ָयावर फिरत असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण केली.

-
आरोपींनी चाकुचा धाक दाखवून फिर्यादीकडून एक रियलमी कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे १५,०००/- रु.) आणि त्यांचे मित्र अर्जुन लाल बेटठेकर यांच्याकडून एक मोबाईल (किंमत अंदाजे २०००/- रु.) जबरदस्तीने हिसकावून घेतला.
-
तसेच दिलीप सीताराम माहुरे (वय ५७) यांच्याकडून नारायण दालमिलजवळ चाकुचा धाक दाखवून मारहाण करत नगदी १७००/- रुपये असा एकूण १८,७००/- रुपयाचा मुद्दमाल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इतर उघडकीस आलेले गुन्हे
-
गुन्हा क्र. १: एम.आय.डी.सी., अकोला येथे फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचा रियलमी मोबाईल आणि नगदी ५००/- रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

-
गुन्हा क्र. २: दि. २७/०५/२०२६ रोजी फिर्यादी गजानन महादेव भटकर यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडून नगदी ४,०००/- रुपये हिसकावून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
तपास आणि अटक करण्यात आलेले आरोपी गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारा खालील आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली:

-
आकाश उर्फ करण विनोद थुकेकर (रा. कृषी नगर, अकोला)
-
यश उर्फ राम संतोष नवले (रा. कृषी नगर, अकोला)
-
अभिजित उर्फ अभि विश्वनाथ वैरागळे (रा. कृषी नगर, अकोला)
-
पुजा दिनेश वानखेडे (रा. कृषी नगर, अकोला)
जप्त करण्यात आलेला मुद्दमाल:-
आरोपींकडून एक पल्सर मोटरसायकल, एक सुझुकी एक्सीस मोटरसायकल, एक लोखंडी चाकू, एक रियलमी कंपनीचा मोबाईल आणि ३३०० रुपये नगदी असा एकूण २४,१०० रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथक :-
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय जाधव (थणेदार पो.स्टे. एम.आय.डी.सी.), पोउपनि देवीदास फुलुंबरकर, पोहेकॉ विजय अंभोरे, सतीश प्रधान, निलेश वाकोडे आणि अथर खान यांनी यशस्वी केली आहे.




