अकोला: वृद्ध महिलेची सोन्याची पोत पळवणारा आरोपी अटकेत; १००% मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अकोला यांनी वृद्ध महिलेवर हल्ला करून सोन्याची पोत पळवणाऱ्या आरोपीला जेरबंद करून १००% मुद्देमाल हस्तगत करण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे.

      अकोला:- दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ०१:१५ वाजता तक्रारदार सौ. कौसल्या नामदेवराव राऊत (वय ६२ वर्षे, रा. लोखंडे ले-आऊट, मोठी उमरी, अकोला) या त्यांच्या सुनेसह दवाखान्याचे काम आटोपून जुना जनता भाजी बाजार परिसरातून भाजीपाला घेऊन परत जात होत्या. विदर्भ हँडलूमच्या दुकानासमोर त्या ऑटोची वाट पाहत उभ्या असताना, एका अज्ञात इसमाने तोंडाला रुमाल बांधून पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला.



महिलेने विरोध केला असता, आरोपीने त्यांना चापटा मारून व हात पिरगळून जबरदस्तीने सोन्याची पोत तोडली आणि पळ काढला. याप्रकरणी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथे अपराध क्रमांक २५३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६), ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची कारवाई व आरोपीस अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पो. नि. नितीन लेव्हरकर यांनी तातडीने एक विशेष तपास पथक गठीत केले.



तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, जनता भाजी बाजार परिसरात एक संशयित इसम फिरत असल्याची बातमी मिळताच एलसीबी पथकाने परिसराची घेराबंदी केली आणि सापळा रचून संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले.

  • सखोल चौकशी केली असता, त्याने ०९ जुलै रोजी वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याची पोत पळवून नेल्याची कबुल दिली.
  • अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव: समीर खान नासिर खान (वय २९ वर्षे, रा. आडगाव बुद्रुक, ता. तेल्हारा, जि. अकोला).



  • तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीने हिसकावून नेलेला सर्वच्या सर्व १००% मुद्देमाल लगड स्वरूपात जप्त करण्यात यश मिळवले आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 कामगिरी करणारे पोलीस पथक

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांनी केली:



  • पोलीस निरीक्षक: नितीन लेव्हरकर

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक: निलेश देशमुख

  • पोलीस अंमलदार: शेख हसन, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, रवी खंडारे, श्रीकांत पातोंड, राज चंदेल, अमोल दिपके, प्रकाश लोखंडे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!