अमरावती ग्रामीण LCB ची मोठी कारवाई: खल्लार दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी लालखडीतून जेरबंद!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अमरावती शहरातून जेरबंद

अमरावती: स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अमरावती ग्रामीणच्या पथकाने खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरारी आरोपीला अमरावती शहरातून ताब्यात घेतले आहे.

दिनांक २१/०८/२०२४ रोजी तक्रारदार कपिल हिम्मतराव गुडधे (रा. नायगाव बोर्डी) यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते ‘भारत फायनान्स बँक’ मध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.



अंजनगाव सुर्जीतून बचत गटाच्या कर्जाचे पैसे वसूल करून रात्री सुमारे १०:३० वाजता दर्यापूरकडे जात असताना, ईटकी फाट्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलने येऊन त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्याकडील १,४८,५३२/- रुपये रोख, एक टॅब आणि थंब स्कॅनर (किंमत सुमारे १०,०००/- रुपये), असा एकूण १,५८,५३२/- रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला होता.

याप्रकरणी खल्लार पोलीस ठाण्यात अप.क्र. १७६/२०२४ कलम ३०९(६), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले होते, मात्र त्यातील मुख्य आरोपी सलीम खाँ नईम खाँ (रा. पिंजरपुरा, अंजनगाव सुर्जी) हा घटनेच्या दिवसापासून फरार होता.



आज दिनांक २८/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणचे पथक अंजनगाव सुर्जी परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फरार आरोपी सलीम खाँ हा अमरावती शहरातील लालखडी चौकात दुपारी येणार आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने लालखडी परिसरात सापळा रचून सलीम खाँ नईम खाँ (वय ३२ वर्ष, रा. अंजनगाव सुर्जी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी त्याला खल्लार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी

मुख्य आरोपी सलीम खाँ नईम खाँ (वय ३२) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मंदिर चोरी आणि रेती चोरी यांसारखे गुन्हे नोंद आहेत.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई निकेतन कदम (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) आणि दत्ता तोटेवाड (अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



  • नेतेत्व: पो.नि. अशोक लांडे (स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण)

  • पथक: पोलीस अंमलदार मंगेश लकडे, सचिन मसांगे, रूपेश गावंडे आणि चालक प्रज्वल राऊत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!