गोंदियात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २.०५ किलो गांजासह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया (१ ऑगस्ट २०२६):

गोंदिया जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत एक मोठी सफलता मिळवली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या विक्रीसाठी आणलेला २.०५ किलो गांजा, एक अँड्रॉइड मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण २,१०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



नेमकी घटना काय?

गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ३१ जुलै २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. मनीष दीपक रामटेके (वय २७ वर्षे, रा. गांधी वार्ड, गोंदिया) हा तरुण गड्डाटोली परिसरात गांजा विक्रीसाठी फिरत असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली.



पोलिसांची धाड आणि मुद्देमाल जप्ती

माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गड्डाटोली येथील ओव्हरब्रिजखाली छापा टाकला. तेथे संशयित मनीष रामटेके बसलेला आढळला.

पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातील दोन पत्र्याच्या (टिन) पेट्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रित गांजा आढळला. पोलिसांकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:



  • २.०५ किलो गांजा: किंमत रु. २,००,५००/-

  • १ अँड्रॉइड मोबाईल: किंमत रु. १०,०००/-



  • दोन पत्र्याच्या पेट्या: किंमत रु. ३००/-

  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. २,१०,८००/-

    आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपी मनीष दीपक रामटेके याच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही उत्कृष्ट कारवाई पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पो.नि. रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सपोनि अभिषेक जंगमवार, सफौ राजू मिश्रा, पोलीस अंमलदार/हवालदार महेश मेहर, सुजित हलमारे, संजय चव्हाण, प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले आणि चालोपोषि राम खंडारे यांनी मोलाची भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!