नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: ३ लाख ६० हजारांच्या एमडी पावडरसह आरोपीला अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर:

नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे, तर त्याच्या मुख्य साथीदाराचा शोध सुरू आहे.



नेमकी घटना काय?

दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ०१:०० ते ०२:५० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते.

तुळशीबाग रोडवरून एक संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या बर्गरमन (Burgman) मोपेडवरून दसरा रोडकडे जाताना दिसला. त्याच्या मोपेडला मागे नंबर प्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून दसरा रोडवरील ‘मॅस्कार्ट होंडा सर्व्हिस सेंटर’समोर त्याला थांबवले.



आरोपीची ओळख व झडती

पंचांसमक्ष विचारपूस केली असता चालकाने आपले नाव:

  • नाव: शेख शेहजान शेख समशेर (वय २३ वर्षे)



  • पत्ता: प्लॉट नं. ६७, मासूम कुँवा जवळ, भुतीया दरवाजा, दसरा रोड, महाल, नागपूर

असे सांगितले.



संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात झिपलॉक पन्नीमध्ये २० ग्राम एम.डी. (MD) पावडर मिळून आली.

३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  1. २० ग्राम एम.डी. पावडर

  2. ०१ ॲपल आयफोन (iPhone)

  3. बर्गरमन मोपेड (क्रमांक: MH 49 BX 0726)

एकूण जप्त किंमत: ₹३,६०,०००/- (तीन लाख साठ हजार रुपये)

ड्रग्ज विक्रीचा उद्देश आणि गुन्हा नोंद

आरोपीची अधिक विचारपूस केली असता, ही एम.डी. पावडर त्याचा साथीदार शेख अर्शद उर्फ राजा मोहम्मद लतीफ शेख (वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. ८७, माँ भवानी नगर, चामट लॉन समोर, खरबी, वाठोडा, नागपूर) याची असून, ती विक्री करण्यासाठी बाळगल्याची कबुली त्याने दिली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडरची विक्री करताना आरोपी रंगेहात सापडला.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील कारवाई व तपास

अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

तपास पथक

ही धडक कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त – गुन्हे, नागपूर शहर)

  •  दीपक अग्रवाल (पोलीस उप आयुक्त – डिटेक्टिव्ह)

  •  वैभव जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त – गुन्हे शाखा)

प्रत्यक्ष कारवाई करणारे पथक:

पोनि. भारत क्षिरसागर, सपोनि. आनंद बिचेवार, पोउपनि. नागेश पुन्नावाड, पोहवा विवेक अढाऊ, शेख इम्रान, ज्ञानेश्वर भोगे, गणेश जोगेकर, मपोहवा. अनुप यादव, पोअं. संतोष शेंड्रे, नितीन राठोड, धनपत मंझरेटे व राहुल पाटील.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!