
खरांगणा पोलिसांची अवैध मोहादारु विक्रेत्यांवर केली कार्यवाही…
खरांगणा (जि. वर्धा):
खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली, पेट्रोलिग करत असताना अवैधरित्या. एका सुझुकी बर्गमन मोपेडवरून बेकायदेशीर गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत आरोपीकडून एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.परिसरातील अवैध धंद्यांवर व दारू तस्करांवर खारंगणा पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. एका पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून गावठी मोहा दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या मोपेड (स्कुटी) गाडीवरून मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू घेऊन आजी मोठी पेट्रोल पंप कडून माजी कडे जात असल्याची अत्यंत खात्रीशीर गुप्त माहिती खारंगणा पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ वेगाने हालचाली करत नियोजित मार्गावर नाकाबंदी लावली. संशयित पांढऱ्या रंगाची मोपेड येताच पोलिसांनी तिला थांबवून चालकाची व वाहनाची पाहणी केली. त्यावेळी मोपेडवरून अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील:
पोलीस कारवाईत खालीलप्रमाणे एकूण १,२९,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे:
-
पांढऱ्या रंगाची प्लास्टिक कॅन: अंदाजे २५ लिटर गावठी मोहा दारू (किंमत ₹२०० प्रतिलिटरप्रमाणे) – ₹५,०००

-
मोठी प्लास्टिक पन्नी (पिशवी): अंदाजे २० लिटर गावठी मोहा दारू (किंमत ₹२०० प्रतिलिटरप्रमाणे) – ₹४,०००
-
मोपेड स्कूटर: पांढऱ्या रंगाची सुझुकी बर्गमन (Suzuki Burgman) मोपेड (क्र. MH 32 TH 9561) – अंदाजे ₹१,२०,०००

एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,२९,०००/-
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात धडक कारवाई
सदरची यशस्वी कारवाई:
पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखिले यांच्या आदेशानुसार ठाणेदार: अंबादास टोपले (पोलीस स्टेशन खारंगणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोळंके , पोलीस अंमलदार मनीष श्रीवास, पोलीस अंमलदार मनीष वैद्य आणि पोलीस शिपाई अमर करणे यांनी केली
. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खरांगणा पोलीस करत आहेत.




