अकोला: उपचाराच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला सिव्हिल लाईन पोलिसांकडून अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला (प्रतिनिधी): अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला रुग्णाचा उपचाराच्या बहाण्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

तक्रारदार महिला ही मागील ७ ते ८ महिन्यांपासून संबंधित डॉक्टरकडे उपचार घेत होती. २९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ६.०० वाजताच्या सुमारास ती उपचारासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये गेली होती.



त्यावेळी आरोपी डॉक्टरने तपासणीच्या व चेहऱ्यावरील केसांवर उपचार करण्याच्या बहाण्याने महिलेला वेगवेगळ्या खोलीत नेले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अशोभनीय स्पर्श करून, मिठी मारण्याचा तसेच चुंबन करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. इतकेच नव्हे तर मेडिकल स्टोअरमध्ये औषध देण्याच्या बहाण्यानेही तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी नुसार गुन्हा दाखल केला.



आरोपीला तात्काळ अटक

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या काही वेळातच आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

  • अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव: प्रवीण श्यामसुंदर अग्रवाल (वय ४६ वर्षे)



  • राहणार: म्हाडा कॉलनी, रामनगर, अकोला

पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या आदेशानुसार पुढील पथकाने आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई केली:



  • पीएसआय (PSI): शामली निकम

  • पीएसआय (PSI): दिनेश पवार

  • पोलीस अंमलदार: श्रीकांत आजलसांडे (पोहेकॉ), शक्ती कांबळे (पो.कॉ.), अक्षय तायडे (पो.कॉ.) आणि एकनाथ त्रिकाळ (पो.कॉ.)

सदर प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!