चंद्रपुरात १७.४७५ किलो गांजा जप्त; ओडिसातील आरोपींसह ३ जणांना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौक येथे सापळा रचून आंतरराज्यीय गांजा तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या कारवाईत १७.४७५ किलो गांजा, एक चारचाकी वाहन आणि ४ मोबाईल फोन असा एकूण १७,०८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा सविस्तर तपशील



ओरिसा राज्यातून काही इसम चारचाकी वाहनाने गांजा आणून तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बामणी चौक येथे सापळा रचला आणि संशयित वाहनाला (क्र. MH-24 BR-9282) ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध रीतीने वाहतूक केला जाणारा १७.४७५ किलो गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेले आरोपी



  • अमोल रमेश कांबळे (वय ३३ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. एरंडी सरोडा, ता. औसा, जि. लातूर)

  • सदानंद रवींद्र जना (वय ३२ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. साबोरीया, ता. खलीगोट, जि. गंनजम, राज्य: ओडिसा)



  • ओंगा बिरा कोवासी (वय २८ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. बोपनपल्ली, ता. कालीमेला, जि. मलकनगिरी, राज्य: ओडिसा)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल



  • गांजा: १७.४७५ किलो

  • वाहन: चारचाकी क्र. MH-24 BR-9282

  • इतर: ४ मोबाईल हँडसेट

  • एकूण किंमत: ₹१७,०८,७५०/-

आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारशा येथे अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारशा पोलीस करत आहेत.

ही धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दीपक कांकेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!