पुणे ग्रामीन LCB ने जप्त केला ५३ लक्ष रु किंमतीचा प्रतिबंधित गुटखा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे ग्रामीण– सवीस्तर व्रुत्त असे की विनापरवाना विक्रीसाठी सुगंधीत गुटखा वाहतूक करणारे दोन इसमांना टेम्पोसह घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेस सातारा – पुणे महामार्गावरून कर्नाटक राज्यातून एक टेम्पो प्रतिबंधीत गुटखा विनापरवाना विक्रीसाठी घेवून जात असलेबाबत दि ०६/०९/२०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली होती. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक आनंद  भोइटे बारामती विभाग, मा उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे भोर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व राजगड पोस्टे कडील पोनि आण्णसाहेब घोलप यांनी पथक तयार करून किकवी पोलिस चौकीचे समोर सापळा लावला होता.
स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिस स्टेशनचे पथकास एक टेम्पो नं. एम. एच. ४८ टी. ४७१७ हा मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे मिळून आला त्यामध्ये एकूण ५१ लाख ६० हजार रूपये किंमतीचा विमल पानमसाला नावाचा प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, इलायची (गुटखा) माल मिळून आला. टेम्पो चालकाचे नाव दत्तात्रय
शंकर गोगावले वय ४२ वर्षे, तसेच सोबत संतोष सुभाष गोगावले वय ४५ वर्षे, दोघे रा. गोगलवाडी, पुणे असे असे असून प्रतिबंधीत गुटखा त्यांनी कर्नाटक राज्यातून सद्दाम ऊर्फ मेहबुब कोतवाल याचेकडून आणून तो मयुर अगरवाल, रा. पुणे याचेकडे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे त्याबाबत राजगड पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण संयुक्तपणे पुढील तपास करीत आहेत सदरबाबत
राजगड पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. ४९९ / २०२३, भा.दं.वि. कलम ३२८,१८८,२६९,२७३, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमाचे २०११ कलम २६ (२) (आय), २६ (२) (vi), २७ (३)(ड), २७(३)(E), ५९ (iii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास राजगड पोलिस स्टेशन करत
आहे. सन २०२३ मध्ये आतापर्यंत  स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडून मोठया सहा कारवाई झालेल्या असून सुमारे दोन कोटी पंच्चाहत्तर लाख रुपये किं चा प्रतिबंधीत गुटखा हस्तगत करणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत  गोयल पुणे ग्रामीण, मा अपर पोलिस अधीक्षक आनंद  भोइटे बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे भोर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोहवा अजित भुजबळ, पोना बाळासाहेब खडके, पोकॉ मंगेश भगत, राजगड पोस्टे कडील पोनि आण्णासाहेब घोलप, पोसई विनय झिंजुर्के, सफौ जगदीश शिरसाठ, पोना नाना मदने, गणेश लडकत, मयूर निंबाळकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!