अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; सराईत चोराला अटक, इलेक्ट्रीक वायर चोरीचे ११ गुन्हे उघडकीस

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे राजापेठ आणि गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेले इलेक्ट्रीक वायर चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसा कडून सुमारे ६५,००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

घटनेचा पार्श्वभूमी व फिर्याद :-



पल्स मेडिकल कार्डीयाक सेंटर (दरोगा प्लॉट, अमरावती) चे व्यवस्थापक अक्षय मनोहर ठाकरे (वय २९, रा. न्यू गणेश कॉलनी) यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरोगा प्लॉट येथील हॉस्पिटलच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून ४ ऑगस्ट सकाळी ११.०० ते ६ ऑगस्ट सायंकाळी ६.०० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोराने आर. आर. कंपनीच्या ५१ केबलचे बंडल (किंमत सुमारे ७०,००० रुपये) चोरून नेले होते. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपीची माहिती



  • नाव: जहीर खान उर्फ नाडा जमीर खान (वय २२ वर्ष)

  • पत्ता: अकबर नगर, नाल्याच्या पुलाजवळ, कब्रस्थान जवळ, अमरावती



पोलिसांची कारवाई व जप्त मुद्देमाल :-

राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे आणि डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. आरोपी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरून वायर कापून, ते जाळून त्यातील तांबे काढत असे.



तपासादरम्यान आरोपीकडून खालील गुन्ह्यांतील तांबे जप्त करण्यात आले:

  • राजापेठ पो. स्टे. (४ गुन्हे): दरोगा प्लॉट, साई गजानन कॉलनी (साई नगर), शक्ती हाईट्स (विष्णु नगर) आणि चंदन नगर येथून चोरी केलेले एकूण २३ किलो तांबे.

  • गाडगे नगर पो. स्टे. (७ गुन्हे): विदर्भ प्रीमियम सोसायटी (सामरा नगर), जिजाऊ नगर (कठोरा नाका), अभिनव कॉलनी, प्रकाश नगर, त्रिमुर्ती विहार (नवसारी), डॉक्टर कॉलनी आणि कठोरा रोड जिजाऊ नगर येथून चोरी केलेले एकूण ३१ किलो तांबे.

पोलिसांनी आरोपीकडून एकूण ६५,००० रुपये मूल्याचे ५४ किलो जाळलेले तांबे जप्त केले आहे.

तपास पथक :-

ही यशस्वी कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पो.नि. संदीप चव्हाण, पो.नि. उमेश मुंढे, स.पो.नि. नितीन शिंदे यांच्यासह मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवी लिखितकर, शशी शेळके, अंकुश काळे, प्रशांत बेलोरकर, अमोल खंडेजोड, आबिद शेख, रफिक खान, सतीश टपके, आकाश यादव, अर्जुन कदम, अमोल देशमुख आणि पंकज गाठे या पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!