शेघाट येथील कार चोरीचा गुन्हा उघड; एक आरोपी व विधी संघर्षित बालक ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती (दि. १६ ऑक्टोबर २०२६):

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदुरजनाघाट हद्दीत घडलेली चारचाकी वाहन चोरीची उकल करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी एका प्रौढ आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली होंडा सिटी कार आणि एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



गुन्ह्याची पार्श्वभूमी:-

फिर्यादी मंगेश केशवराव होले (वय ३५ वर्षे, रा. शेंदुरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती) हे नगरपरिषद शेंदुरजनाघाट येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता त्यांनी त्यांची होंडा सिटी कार (क्रमांक MH 02 AU 6618, अंदाजे किंमत ६०,००० रुपये) घरासमोरील शाळेच्या मैदानात उभी केली होती.



दुसऱ्या दिवशी (दिनांक १०/१०/२०२६) सकाळी ती कार जागेवर दिसून आली नाही. बरीच शोधाशोध करूनही कार न मिळाल्यामुळे त्यांनी शेंदुरजनाघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवला होता.



तपास आणि कारवाई:

पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत कडक सूचना दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली कार व मोबाईल हस्तगत करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी:

१. शेख आवेज शेख राजू (वय २१ वर्षे, रा. शेघाट, ता. वरूड, जि. अमरावती).



२. एक विधी संघर्षित बालक (वय १६ वर्षे १ महिना, रा. शेघाट, ता. वरूड, जि. अमरावती).

मार्गदर्शन व कामगिरी करणारे पथक:

सदर धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक  निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक  दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पार पडली.



या पथकात पोलीस उपनिरीक्षक (PSI) रोहित कुदळे, पोलीस अंमलदार गजेंद्र ठाकरे, सुधीर बावणे, सचिन गायधने, चेतन दुबे, सायबर सेलचे रितेश गोस्वामी आणि चालक प्रज्वल राऊत यांनी सहभाग घेऊन ही कामगिरी बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!