वाडी पोलिसांची कामगिरी: कारखान्यात चोरी करणाऱ्या आरोपींना २४ तासांच्या आत अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपूर:

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका औद्योगिक कारखान्याचे शटर तोडून १ लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या ६ जणांच्या आंतर-स्थानिक चोरांच्या टोळीला वाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल, गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.



नेमकी घटना काय?

फिर्यादी स्वप्नील संजय मुकटे (वय ३७, रा. मुंशी मंदीर रोड, महाल, कोतवाली, नागपूर) यांच्या मालकीचा नागपूरमधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीच नं. ६, वडधामना येथील “सिग्नम फायर प्रोटेक्शन (इंडिया) प्रा. लिमिटेड” नावाचा कारखाना आहे.



दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १८:०० वाजेपासून ते १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०६:०० वाजे दरम्यान अज्ञात चोरांनी कारखान्याच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी कंपनीमधील कॉपरपट्टी रोल, स्क्रॅप, वेगवेगळ्या डाय आणि इतर महत्त्वाचे साहित्य असा एकूण १,०९,८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच जाताना कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे, खिडकीची काच व इतर साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले.



गुन्हा दाखल व तांत्रिक तपास

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाडी पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपलब्ध माहितीच्याआधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन खालील ६ आरोपींना ताब्यात घेतले:



१. साहिल ताराचंद पाचे 

२. प्रेम सागर दुपारे 



३. संजयकुमार ओमप्रकाश चव्हाण 

४. शुभम राजु नित 

५. राहुल पिलुराम भैसवारे 

६. राहुल रामु पवार

पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून खालील ऐवज जप्त केला आहे:

  • गुन्ह्यात चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेली बजाज प्रवासी ऑटो (क्रमांक: एमएच ४९ ए.आर. ०६९०)

  • ऑटोमध्ये चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल

  • आरोपींचे ४ मोबाईल फोन

    एकूण जप्त मुद्देमाल: २,४६,४०० रुपये

    वाडी पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याची उकल करत सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मार्गदर्शन आणि यशस्वी पोलीस पथक:

ही धडाकेबाज कारवाई वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  •  विश्वास नांगरे पाटील (पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

  •  नविणचंद्र रेड्डी (सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

  •  वसंत परदेशी (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहर)

  •  सिंगा रेड्डी ऋषीकेश रेड्डी (पोलीस उप आयुक्त, परिमंडल क्र. १)

  •  यशवंत नलवडे (सहायक पोलीस आयुक्त, एमआयडीसी विभाग)

पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी:

पोनि. नितीन मगर, सपोनि. उत्तम जायभाये, पोलीस हवालदार नागेश्वर दासरवार, विजय वायुुडे, राहुल नागदेवे, चंद्रकुमार टेकाम व पोलीस अंमलदार दिलीप बाजड यांनी या संपूर्ण कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!