मौदा पोलिसांची मोठी कारवाई: गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या २ आरोपींना अटक, २८ जनावरांची सुटका

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


दिनांक २८/१०/२०२६ रोजी मौदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना, पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी माथनी शिवारातील टोल नाका येथे नाकाबंदी केली.

नाकाबंदीदरम्यान एक आयसर गाडी (क्र. सीजी-०४/पी.ई-६५८२) तेथे आल्याचे दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये खालीलप्रमाणे दोन व्यक्ती मिळून आले:





१. पिंडू रामकिशन मेहरा (वय ३२ वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, इंदौर, मध्य प्रदेश, ह.मु. रायपूर, छत्तीसगड)



२. मो. अली इरशाद अहमद (वय २४ वर्षे, रा. कामगार नगर, कमर कॉलनी, नागपूर, दोन्ही रा. कळमना नागपूर)



जनावरांची दयनीय अवस्था: वाहनाची पाहणी केली असता त्यात एकूण २८ गोवंश जनावरे कोंडून नेली जात असल्याचे निष्पन्न झाले. या जनावरांना कोणतीही खाद्यान्नाची सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. तसेच त्यांच्या शिंगांना व पायांना आखूड दोरखंडाने बांधून अत्यंत निर्दयेपणाने वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:  पंचनामा करून पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला:



  • आयसर गाडी (क्र. सीजी-०४/पी.ई-६५८२) – किंमत १२,००,०००/- रुपये

  • २८ गोवंश जनावरे – किंमत २,८०,०००/- रुपये



  • २ अँड्रॉइड मोबाईल – किंमत २०,०००/- रुपये

  • एकूण जप्त मुद्देमाल: १५,००,०००/- रुपये

गुन्हा दाखल:  सदर प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मौदा पोलीस स्टेशन येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांचे मार्गदर्शन व कारवाई:   हर्ष ए. पोद्दार (वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा), अनिल म्स्के (अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा) आणि प्रशांत एन.एम. (सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्हान उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक  लसते यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. मौदा पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करत एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!