
एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; २७.७० लाखांच्या अवैध दारूसह ६ आरोपी जेरबंद.

गडचिरोलीत पोलिसांची धडक कारवाई: एटापल्ली येथे २७ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारू व वाहनांचा मुद्देमाल जप्त; ०६ आरोपींना अटक!
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करत, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन एटापल्लीच्या पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई यशस्वी केली.

१. घटना कशी घडली?
-
२९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास एटापल्ली पोलीस पथक गस्त घालीत असताना, जीवनगट्टा गावात दोन संशयित वाहनांमधून देशी दारूचा माल उतरवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

-
या माहितीच्या आधारे पोलिसांनी जीवनगट्टा ते बारसेवाडा रोडवर सापळा रचला.

-
काही वेळातच एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी दारू टाकण्यासाठी आली आणि तिच्या पाठोपाठ लगेच एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली.
-
पांढऱ्या स्कॉर्पिओमधून दारूच्या पेट्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये भरल्या जात असताना, पोलिसांच्या गाड्या समोरून व मागून आल्याचे आरोपींच्या लक्षात आले.

-
आरोपींनी वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने दोन्ही बाजूंनी मार्ग बंद करत त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवले.
-
या कारवाईत पोलिसांनी ०६ आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन ०२ इसम तिथून पसार झाले.

२. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (किंमतीसह तपशील):
तपासामध्ये आरोपींनी एकूण ६० पेटी अवैध देशी दारू आणली असल्याचे सांगितले, त्यापैकी २९ पेटी देशी दारू जीवनगट्टा येथील संतोष नरोटे याच्या घरी ठेवली होती. पंचासमक्ष दोन्ही वाहनांची व संतोष नरोटेच्या घराची झडती घेतली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
-
रॉकेट देशी दारू (संत्री कंपनी): २२ बॉक्स (प्रती बॉक्स १०० नग), किंमत २,२०,०००/- रुपये.
-
प्रिमियम नं. १ कोकण देशी दारू: १८ बॉक्स (प्रती बॉक्स १०० नग), किंमत १,८०,०००/- रुपये.
-
पांढरी स्कॉर्पिओ गाडी (क्र. एम.एच ३१ सीडीसी ६८१६): अंदाजे किंमत ८,००,०००/- रुपये.
-
काळी स्कॉर्पिओ गाडी (क्र. सी.जी ०५ एक्यू १३२६): अंदाजे किंमत १५,००,०००/- रुपये.
-
मोबाईल फोन: आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेले ७ मोबाईल फोन, किंमत ७०,०००/- रुपये.
-
एकूण जप्त मुद्देमाल: २७,७०,०००/- रुपये.
३. अटकेत असलेले आरोपी:
घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले ६ आरोपी खालीलप्रमाणे आहेत:
-
आकाश प्रशांत मुजुमदार (वय ३२, रा. एटापल्ली, गडचिरोली)
-
अफसर शेख हुसेन (वय ३६, रा. बडा ताजबाग, नागपूर)
-
प्रशांत बजरंग आंबटकर (वय ४३, रा. नंदुरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा)
-
पंकज शामल बारई (वय २९, रा. जांबिया गट्टा, जि. गडचिरोली)
-
तुषार मिहीर रॉय (वय २५, रा. टी.व्ही ७९ जनकपूर, पाखंजूर, छ.ग., ह.मु. गडचिरोली)
-
सुरत सत्यजित मंडल (वय २१, रा. टी.व्ही १०२ किसकनगर, पाखंजूर, छ.ग., ह.मु. गडचिरोली)
४. फरार/पाहिजे असलेले आरोपी व नोंदविण्यात आलेला गुन्हा:
-
फरार आरोपी: संतोष नरोटे (रा. जीवनगट्टा), गौरव प्रभाकर माकोडे (रा. वर्धा) आणि मिथुन निर्मल मलिक (रा. गट्टा जांभीया) या तीन आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
-
गुन्हा: वर नमूद आरोपींच्या विरोधात पोलीस अभिलेखावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असतानाही ते वारंवार संघटितपणे गुन्हे करत असल्याने, पोस्टे एटापल्ली येथे अपराध क्र. २०७/२०२६ कलम ११२ (२) भा.न्या.सं. २०२३ सहकलम ६५ (ई), ९८, ८३ म.दा.का. अन्वये एकूण ०९ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-
तपास: सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहेत.
५. कारवाईचे मार्गदर्शन:
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोस्टे एटापल्लीचे प्रभारी अधिकारी पोनि. मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोउपनि. चंद्रकांत लांबट व पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



