नागपुरात देहव्यापार करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; आरोपी अटकेत, पीडित महिला मुक्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपुरात गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; प्रतापगनर हद्दीत देहव्यवसाय चालवणाऱ्या आरोपीस अटक, पीडित महिला सुखरूप मुक्त!

नागपूर:



दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी १७.२० ते २१.२० वाजे दरम्यान, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रतापगनर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. वर्धा रोडवरील छत्रपती चौक, निरज डेकोर समोरील सार्वजनिक रस्त्यावर पंचसाक्षेडोही ही धाड टाकण्यात आली.



या कारवाईदरम्यान तुषार प्रमोद फुलकारी (वय ३२ वर्षे, रा. दर्शन रेजिडेन्सी, आर्वी नाका, कारला रोड, वर्धा) नावाचा आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका पीडित महिलेला कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले. तो ग्राहकांसाठी जागा व इतर व्यवस्था उपलब्ध करून देताना रंगेहात मिळून आला.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:  पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रोख २,०००/- रुपये, १ मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे १२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिला सुरक्षित करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल व पुढील तपास:  आरोपीविरुद्ध राणा प्रतापगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम १४३(२) सह अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम-१९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी राणा प्रतापगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



कारवाई करणारे पथक:  सदर धडक कारवाई नागपूर शहरचे पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, सह-पोलिस आयुक्त नविंचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन)  दीपक अग्रवाल, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोनि. दर्शन पाटील, सपनि. भगवान कोळी, सफौ. दीपक बिंदाणे, पोहवा. प्रकाश माथनकर, सुनील वाकडे, मपोहवा. लता गवई व मपोअं. पुनम शेंडे यांनी सहभाग घेतला होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!