अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीचे गुन्हे उघड, दुचाकी जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; राजापेठ व खोलापुरी गेट परिसरातील चोरीचे गुन्हे उघड, दुचाकी जप्त

अमरावती  अमरावती शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत अमरावती शहर गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावत राजापेठ आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत रेकॉर्डवरील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे, तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

कारवाईचा तपशील

पोलीस आयुक्तालय हद्दीत होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना, गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी अब्दुल अहेफाज अब्दुल अजीज (वय २४ वर्षे, रा. ईमाम नगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून राजापेठ आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल झाली आहे.



उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल

अ.क्र. पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक व कलम जप्त मुद्देमाल / फरार आरोपीची माहिती
१. राजापेठ अप.क्र. ८७४/२०२६, कलम ३०५ (ब) बीएनएस

पॅशन प्रो दुचाकी (क्र. MH28/TN 7219), इंजिन क्र. HA10ENDHM40365, चेसिस क्र. MBLHA10AWDHM09961



२. खोलापुरी गेट अप.क्र. २७४/२०२६, कलम ३०३ (ब) बीएनएस

फरार आरोपी: उबेद शाहा (रा. रौशन नगर, अमरावती)



३. खोलापुरी गेट अप.क्र. १४५/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस

फरार आरोपी: उबेद शाहा (रा. रौशन नगर, अमरावती)

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२)  शाम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती प्राजंली सोनवने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)  निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



या पथकात वपोनि दिनेश दहातोंडे, वपोनि अतुल वर, सपोनि दशरथ आडे, पोउपनि सचिन माकोडे यांच्यासह फिरोज खान, संभाजी केंद्रे, मंगेश लोखंडे, संजय भारसाकळे, सय्यद नाझीमोद्दीन, सचिन भोयर, रणजीत गांवडे, नरेश मोहरील, सुरज चव्हान, सागर ठाकरे, निखील गेडाम, चालक अंमलदार चेतन शर्मा आणि प्रभात पोकळे या पोलीस अंमलदारांचा समावेश होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!