मित्रानेच केला मित्राचा खुन…..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

रावेत(पिंपरी-चिंचवड) (सुनील सांभारे)— सवीस्तर व्रुत्त असे की  रावेत पोलिस  स्टेशन हद्दीत दि.०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे,  पुणे हायवे जवळ रावेत ता. हवेली जि. पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट-खंबाता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोंडावर सिंमेटची वीट ३ ते ४ वेळा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. सदर घटनेबाबत शिवकुमार घनश्याम प्रजापती वय १९ वर्षे यांनी फिर्याद दिल्याने रावेत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२८/२०२३ भा.द.वि.कलम.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळुन गेल्याने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे  सह. पोलिस आयुक्त डॅा. संजय शिंदे ,अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी गुन्हा उघडकीस आणनेकामी सुचना व आदेश दिले. होते त्यानुसारससदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी नामे दिनेश रामविलास यादव हा गुन्हा केलेनंतर गेले मार्गाचे
सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले यामध्ये आरोपी हा सेंट्रल चौक देहुरोड येथून एका टॅम्पो मध्ये बसुन मुंबई बाजुकडे गेल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपी याचे मिञ व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना दि.०७/०९/२०२३ रोजी सपोनि पी.आर. शिकलगार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर आरोपी शिवाजी चौक कल्याण येथे आहे. अशी माहिती प्राप्त होताच रावेत पोलिस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलिस स्टेशन येथे आणले.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे सह. पोलिस आयुक्त डॅा संजय शिंदे,  अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी., पोलिस उप-आयुक्त काकासाहेब डोळे, सहा पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि  पी आर शिकलगार,  विशाल जाधव, पोलिस उप निरीक्षक रविंद्र पन्हाळे,पोहवा  कोळगे,  गायकवाड, पोशि नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे,रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व मपोना धाकडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!