भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने गौतस्करांना वाहतुकीसाठी मदत करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

भंडारा– सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/०९/२०२३ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, कैलास पटोले,किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे हे अवैध जनावरे वाहतुकीवर कारवाई संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त
झाली की, “साकोली कडुन नागपूर कडे गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता पिकअप वाहनाने नेत असुन त्यासाठी अंदाजे ३ ते ४ इसम अवैध जनावरांचे वाहतुक सुरळीत होण्यासाठी रोडवर हालचाली पाहण्यासाठी राहतात व जनावरांचे गाडया पास करतात” अश्या इसमांचा व जनावरांचे वाहनांचा शोध घेत असतांनी एक सुपर स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक MH-36E1621 ही महामार्गाने भंडारा कडे येतांनी मिळुन आली त्याचे हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव समीर सुलतान शेख, वय १८ वर्ष, रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे सांगीतले. सदर इसम वापरत असलेली मोटरसायकलचे चेसीस नंबर पोर्टलवर चेक केले असता सदर
मोटरसायकल पोलिस स्टेशन लाखनी येथील चोरीच्या गुन्हयातील असल्याचे आढळूण आल्याने मोटरसायकल जप्त करण्यात आली त्याने सोबत इतर दोन साथीदार असल्याचे सांगुन ते मारोती ओमनीने गोवा ढाब्या समोरच्या ओवरब्रिजचे रोडचे बाजुला जनावरांचे गाडया पास करण्यासाठी थांबुन असल्याचे सांगीतल्याने सदर पथकाने लगेच नमुद मारोती ओमनी वाहनाचा शोध घेवून त्यामधील दोन इसम यांना विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नाव १) कुणाल दिलीप बुराडे, वय २१ वर्ष, रा. लाखनी,
२)शशिकांत तुळशीराम नगरकर वय २५ वर्ष, रा. लाखनी
असे सांगीतले. त्यांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी पोलिस स्टेशन लाखनी येथे दाखल गुन्हयात दिनांक ०४/०९/२०२३ चे रात्री दरम्यान बरडकिन्ही गोशाळेतली ५ लहान मोठे गोवंश जनावर चोरी करून मयुर अशोक राऊत रा. गोंदिया यास विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यांचेकडुन एक मारूती ओमणी वाहन
जप्त करून ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे वर नमुद आरोपीतांनी पोलिस स्टेशन लाखनी अंतर्गत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून वर नमुद गुन्हयातील चोरीची मोटारसायकल किंमती ३५,०००/- रूपये, व जप्त मारोती ओमणी वाहन किंमती १,२०,०००/-रू. असा एकुण १,५५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासकरिता पोलिस स्टेशन लाखनी यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, कैलास पटोले,किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!