
अवैद्यरित्या देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
यवतमाळ- जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे त्याच प्रमाणे
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता अवैध धंदे व गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना जिल्हयात प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक १७/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत
असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की, इसम प्रतिक ऊर्फ बंटी गंधारे हा घाटंजी शहरात देशी
बनावटीचे पिस्टल घेवुन घाटंजी येथील अमरनाथ मंदीराचे परीसरात फिरत आहे. खबरचे गांभीर्य लक्षात घेवून स्था.गु.शा. पथकाने
कोणताही विलंब न करता तात्काळ घाटंजी येथे जावुन यवतमाळ नाक्यावरील अमरनाथ मंदीर परीसरात जावुन पाहीले असता
माहिती प्रमाणे एक इसम संशयास्पद स्थितीत वावरतांना दिसुन आला वरुन त्यास ताब्यात घेवून त्याचे नांव गांव विचारले असता
त्याने त्याचे नाव प्रतिक ऊर्फ बंटी दत्तात्रय गंधारे वय २४ रा. घाटंजी जि. यवतमाळ (ह.मु पारवा) असे सांगीतले त्यावरुन पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता प्रतिक ऊर्फ बंटी दत्तात्रय गंधारे यांचे अंगझडतीत पॅन्टमध्ये खोसुन असलेली एक देशी बनावटीची काळया रंगाची मॅग्जीन असलेली पिस्टल किंमत ५०,००० रुपये व पिस्टलचे बॅरल मध्ये ०२ जिवंत काडतुसस किंमत २००० रुपये असा एकुण ५२,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करुन नमुद आरोपीतांना ताब्यात घेवून त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ व कलम १३५ म.पो.का अन्वये पो.स्टे. घाटंजी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. घाटंजी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पो.नि.स्थागुशा, स.पो.नि संतोष मनवर, पोलिस अंमलदार
चालक पोकॉ टेकाम सर्व स्थागुशा यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


