
सराईत सोनसाखळी चोरट्यास पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याखाली केली अटक…
पुणे – संदीप कद्रे – याबाबत सवीस्तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पर्वती पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच पोलिसांनी सुध्दा दम चाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख
१)आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय २५, रा. टेल्को कॉलनी,
दत्तनगर, कात्रज, पुणे),


२)लोकेश मुकुंदा महाजन (वय-२४,रा. गुरुकृपा अपार्टमेंट, दत्तनगर, कात्रज, पुणे मूळ गाव समर्थनगर, खेडी बुद्रुक, जळगाव)

यांना अटक केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी आकाश सुर्यवंशी याच्यावर ३१ तर त्याचा सहकारी लोकेश महाजन
याच्यावर ८ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती
समोर आली आहे. गुन्हे करण्यासाठी सुर्यवंशी याने टोळी तयार केली. या टोळीमार्फत धमकी देऊन, जबरदस्ती करुन, अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून
संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला. कारवाई झाल्यानंतर देखील आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे
वारंवार केले. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या
गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी परिमंडळ- ३ चे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे करीत आहेत.

आतापर्यत पुणे पोलिस आयुक्तांनी ६४ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे हे विशेष


