पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा हैदोस पोलिसाच्या मुलाचाच केला खुन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे –   –    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली
उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत
असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर
अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यानंतर विजय ढुमे हे रक्ताच्या
थारोळ्यात पडले. सिंहगड रोड पोलिस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या हत्या प्रकरणातील
आरोपींचा तपास सुरू आहे. या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल
करण्याचे काम सुरू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!