
नवीन घराचे बांधकामावर ईले्क्टीक कामासाठी आणलेले केबल चोरणार्यास ३ तासात केली अटक…
छत्रपती संभाजीनगर -(जवाहरनगर) : उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. विजयकुमार सपकाळ यांच्या ३ मजली घराचे बांधकाम सुरू असताना घरातील इलेक्ट्रिक फिटिंगसाठी आणलेले ९६ हजार रुपयांचे वायर मध्यरात्रीतून चोरट्याने लंपास केले होते. अवघ्या ३ दिवसांत हा गुन्हा जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला. २५ वर्षीय चोरट्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची
कबुली दिली असून, त्याच्याकडून पोलिसांनी वायरही जप्त केले आहेत जुबेर खान फिरोज खान (वय २५,रा. इंदिरानगर गल्ली नं. २, गारखेडा परिसर) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी
सुनावली.
अॅड. विजयकुमार दामोधर सपकाळ (रा. लक्ष्मीनगर,गारखेडा परिसर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात २७सप्टेंबरला सकाळी चोरीची तक्रार दिली होती. त्यांच्या नवीन घराचे बांधकाम टिळकनगर येथील आदर्श हाऊसिंग सोसायटीत सुरू आहे. सध्या इलेक्ट्रिक फिटिंगचे काम चालू असल्याने कॉपरचे इलेक्ट्रिक वायर आणून ठेवले होते. हे वायर बाथरूममध्ये लॉक करून ठेवलेले होते. २६ सप्टेंबरला रात्री घराच्या तिसऱ्या मजल्यावर बांधकाम
करणारे कामगार झोपलेले होते, तर वाचमन तळमजल्यावर कुटुंबासह झोपलेला होता. सकाळी अॅड. सपकाळ हे बांधकामस्थळी आले असता त्यांना बाथरूममध्ये वायर दिसून आले नाहीत. त्यांनी कामगारांना विचारणा केली असता त्यांनाही चोरीबद्दल माहिती नव्हते. चोरट्याने बाथरूममधील वायरसह पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील लाईट फिटिंग केलेले व इतर फिटिंग करण्यासाठी लटकत ठेवलेले वायरही कापून नेल्याचे
दिसून आले होते. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध
गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
पोलिसांच्या तपासात ही चोरी जुबेरने केल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. गुप्त बातमीदाराने २९ सप्टेंबर रोजी पोलिसांना माहिती दिली, की जुबेर शिवाजीनगर येथील महापालिकेच्या रुग्णालयाजवळ आलेला आहे. पोलिसांनी वेळ न दवडता तिथे धाव घेऊन जुबेरला ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कसून चौकशी केली असता त्याने
गुन्ह्याची कबुली दिली. जुबेरला यापूर्वी १५ ऑगस्टला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात हरनगर पोलिसांनीच अटक केली होती. त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेले असून, पत्नी सोबत राहत नसल्याने तिच्या विरहात तो व्यसनी झालेला आहे व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेला आहे, असे सूत्रांकडून समजते.
सदर कार्यवाही पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त
शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त रंजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वसंत शेळके, चंद्रकांत पोटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मारोती गोरे, पोलिस अंमलदार विनोद बनकर, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर शेलार यांनी केली.




