गावठी पिस्टल व दोन मॅग्जीन सह आरोपी अटकेत…
परभणी – येणाऱ्या सन-उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्वस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर मॅडम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाणे दिनांक 11/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती घेत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत आरोपी आवेज गफारखान पठाण, वय 23 वर्षे रा.नेहरू चौक, गंगाखेड
हा गावठी पिस्टल घेऊन फिरतोय या मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन सदर ईसमास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले व त्यास विचारपूस केली व अंगझडती घेतली असता त्याचे जवळ सदरची 1- गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र), 2-मग्झीन असा एकूण 53,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची पिस्टल व मँग्झीन्स बाळगण्याची शासनाची परवानगी नसतांना बेकायदेशीर पणे ताब्यात बाळगतांना मिळून आला व सदरची पिस्टल इत्यादी त्यांनी पालम येथे राहणाऱ्या एका
इसमाकडून घेतल्याचे सांगीतल्याने त्या दोघांविरोधात पोलिस ठाणे परभणी ग्रामीण येथे गु.र.नं 292/2023 कलम 3, 25 शस्त्र अधिनियम, 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम व अपर पोलिस अधीक्षक .यशवंत काळे व पोलिस निरीक्षक स्था. गु. शा. वसंत चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अजित बिरादार, पोलिस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर
पठाण, रविकुमार जाधव, शेख रफियोदीन, निलेश परसोडे, सर्व नेमणूक स्था.गु.शा. यांनी मिळून केली.