नांदेड स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या पिस्टल व काडतुस बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसनेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,द्वारकादास  चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.
दिनांक 15/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून ग्रामीण पॉलीटेक्नीक ते पांगरा गावाकडे जाणारे रोडवर एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असून तो विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवि वाहुळे, व पोलिस अंमलदार असे ग्रामीण पॉलीटेक्नीक ते पांगरा गावाकडे जाणारे रोडवर गेले असता सदर ठिकाणी सापळा लावून इसम  जमीर दिलावर शेख, वय 28 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. सिकंदरपुर ता. जि. लातुर यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 03 जिवंत काडतूस असा एकूण 36,500/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक,  अबिनाश कुमार नांदेड, अपर पोलिस अधीक्षक, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि रवी वाहुळे, सपोनि पांडूरंग माने,पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, गोविंद मुंडे, सपोउपनि माधव केंद्रे,पोहेकॉ गुंडेराव करले, संग्राम केंद्रे, हनमंत पोतदार,  अफजल पठाण, बालाजी
तेलंग, पोना दिपक पवार, संजीव जिंकलवाड, पोकॉ/ देवा चव्हाण,  विलास कदम, तानाजी येळगे,गजानन बयनवाड, रणधिरसिंह राजबन्सी,  ज्वालासिंघ बावरी, मारोती मोरे,सायबर सेलचे पोहेकॉ दिपक ओढणे,राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलिस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!